KL Rahul : केएल राहुलने दिली प्रेमाची कबुली, ‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या पोरीला पटवलं…

KL Rahul : केएल राहुलने दिली प्रेमाची कबुली, ‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या पोरीला पटवलं…
Published on
Updated on

भारताचा सलामीवीर धडाकेबाज फलंदाज केएल राहुल आपल्या खेळाच्या शैलीने भारतीयांची मने जिंकत आहे. टी-२० विश्वचषकामध्ये पहिल्या दोन सामन्यांत निराशाजनक कामगिरीनंतर राहुलने मागच्या दोन सामन्यांत दमदार खेळी केली. (KL Rahul)

दरम्यान काल झालेल्या सामन्यात (दि. ०५) केएल राहुलने स्कॉटलंडविरुद्ध चमकदार कामगिरी केली. स्कॉटलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार राहुलने घेतला. यावेळी त्याची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी सामन्यादरम्यान स्ट्ँड्समध्ये उपस्थित होती. आथिया शेट्टीचा काल बर्थ डे असल्याने राहुलने दमदार अर्धशतक झळकावत तिला खास गिफ्ट दिले.

KL Rahul : राहुलने फेसबुकवर पोस्ट करत दिली कबुली

याचबरोबर राहुलने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली. राहुलने फेसबुकवर एक फोटो पोस्ट करत अथियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अथियासोबतचा फोटो पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये अथियासोबत असलेल्या नात्याची कबुली दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अथिया राहुलला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ते सतत एकत्र फिरतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसले. काही दिवसांपूर्वी त्यांचा इंग्लंडमध्ये फिरतानाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत होता. पण त्या दोघांनीही अद्याप उघडपणे यावर वक्तव्य केलेले नव्हते. पण आता राहुलने अथियासोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

कोण आहे अथिया शेट्टी…

अथिया ही बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांची मुलगी आहे. तिने २०१५ बॉलिवूडमध्ये 'हीरो' चित्रपटातून पदार्पण केले. 'मुबारक' आणि 'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटांतही काम केले आहे. बॉलिवूड आणि क्रिकेटमधल्या बऱ्याच जोड्या आजवर चर्चेत राहिल्या आहेत. या जोड्यांपैकी विराट कोहली-अनुष्का शर्मा, झहीर खान-सागरिका घाटगे आणि युवराज सिंग-हेजल कीच यांनी लग्नगाठ बांधली आहे. त्यातच आता अथिया व राहुल या जोडीची भर पडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news