

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील टॅलेंट रियलिटी शो, इंडियाज गॉट टॅलेंटचे नवे सत्र– इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 10 घेऊन येत आहे. पुन्हा एकदा हा मंच अशा सामान्य माणसांवर प्रकाश झोत टाकेल, ज्यांच्यात या प्रतिष्ठित मंचावर आपले अपूर्व कौशल्य दाखवून असामान्य बनण्याची क्षमता असते. या शोमध्ये डान्सर, गायक, जादूगार तसेचजुन्या भारतीय कलांचे पुनरुज्जीवन करणारे विविध कलाकार आपली असामान्य कला सादर करून प्रेक्षकांना अवाक करतील. देशातील आजवर प्रकाशात न आलेली रत्ने आणि त्यांची अद्भुत प्रतिभा लोकांसमोर आणणारा हा सीझन सुरू २९ जुलै रोजी होत आहे.
या टॅलेंट शोच्या सतत 10 व्या सीझनमध्ये किरण खेर परीक्षकाची भूमिका बजावणार आहे.
किरण खेर म्हणाल्या, "माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. कारण इंडियन आयडॉल 10 व्या सत्रात प्रवेश करत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हा शो आणखी मोठा मोठा होत गेला आहे. प्रतिभेची व्याख्या करणारा तो एक राष्ट्रीय मंच बनला आहे. इतकेच नाही, तर या शो ने भारतीय प्रतिभेला जागतिक स्तरावर नेले आहे.या शोमध्ये परीक्षक म्हणून काम करतानाया मंचावर 'हुनर'च्या माध्यमातून मला खऱ्याखुऱ्या आणि होतकरू भारताचे दर्शन घडले आहे. आत्तापर्यंतच्या सर्वच्या सर्व, दहा सत्रांमध्ये या कार्यक्रमाशी संलग्न होण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला आनंद वाटतो. 'विजय विश्व हुनर हमारा' हे यंदाचे थीम आहे.