

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण कोरियाची आघाडीची वाहन निर्माता कंपनी Kia India ने अखेर आपली पहिली इलेक्ट्रिक कार EV6 भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. या कारच्या विविध मॉडेल्सच्या किंमतही अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत. भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणारी ही नवीनतम इलेक्ट्रिक कार आहे. चला तर या कारची माहिती जाणून घेऊया… (Kia EV6 Launch)
इलेक्ट्रिक कार Kia EV6 मध्ये ग्राहकांना एकाच चार्जमध्ये मायलेजची हाय रेंज मिळेल. ही कार सिंगल रिचार्जमध्ये 528 किमी अंतर पार करेल. यात 77.4kWh चा बॅटरी पॅक असून रियर-व्हील ड्राइव्हवर हे 229 bhp ची मॅक्स पॉवर आणि 350 Nm पीक टॉर्क जनरेट करेल.
Kia EV6 ही कंपनीची पहली फुल इलेक्ट्रिक कार आहे. याची बुकिंग कंपनीने मागिल ममहिन्यापासून सुरू केली होती. आतापर्यंत कंपनीकडे 355 यूनिटचे बुकिंग झाले आहे. ही इलेक्ट्रिक कार स्पीडमध्ये सुद्धा जादूगर आहे. 5.2 सेकंदांमध्ये 0 ते 100 kmph चा वेग पकडते. (Kia EV6 Launch)
Kia EV6 मध्ये कंपनीने शानदार फिचर्स दिले आहेत. फास्ट चार्जिंग हे यातील एक महत्त्वाचे फिचर्स आहे. केवळ महज 18 मिनिटात ही कार 80 टक्के चार्ज होते. यात 19 इंची एलॉय व्हील सह एलईडी हेडलँप, कनेक्टिंग टेललाइट आणि स्लीक ग्रिलचे डिझाइन मिळेल. या सर्व अत्याधुनिक फिचर्सच्या सहाय्याने कारला स्पोर्टी लुक मिळाला आहे. (Kia EV6 Launch)
Kia EV6 मध्ये एंटरटेनमेंट संदर्भात खास काळजी घेण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या कारचे जे मॉडेल उपलब्ध आहे, त्यात दोन 12.3 इंची स्क्रीन येतात. यातील एक स्क्रीन इंफोटेन्मेंटसाठी असून दूसरी स्क्रीन इंन्स्ट्रूमेंट क्लस्टरच्या कामी येते. तर 2-स्पोक स्टीयरिंग व्हीलवर अनेक फंक्शन्स देण्यात आले आहे. कारमध्ये वेंटिलेटेड सीटही उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Kia EV6 Launch)
Kia EV6 ची भारतीय बाजारपेठेतील किंमत 59.95 लाख आहे. ही किंमत एक्स-शोरूम आहे. EV6 दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली असून यामध्ये GT RWD आणि AWD व्हर्जनचा समावेश आहे. टॉप-स्पेक मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 64.96 लाख रुपये आहे.
Kia ची देशातील ही पहिली आणि फ्लॅगशिप इलेक्ट्रिक कार आहे. भारतीय बाजारपेठेत, हे मॉडेल CBU मार्गाने विकले जाईल आणि नंतर कंपनीच्या स्थानिक प्लांटमध्ये असेंबल केले जाईल. ही इलेक्ट्रिक कार लॉन्च होण्यापूर्वी ANCAP ने त्यांच्या क्रॅश चाचणीमध्ये EV6 ला 5-स्टार रेटिंग दिले आहे.
Kia तिच्या 15 डीलरशिपवर 150 kW DC फास्ट चार्जर स्थापित करेल. या चार्जर्सद्वारे, EV6 सुमारे 40 मिनिटांत 10 टक्के ते 80 टक्के चार्ज होऊ शकते.