

खडकी, पुढारी वृत्तसेवा : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. बोर्ड प्रशासनाच्या वतीने प्रारूप यादी प्रकाशित करण्यात आली असून यादी मध्ये 22 हजार 756 मतदार आहेत. सर्वात कमी मतदार वार्ड क्रमांक 7 मध्ये असून सर्वात जास्त मतदार वार्ड क्रमांक 3 मध्ये आहेत. बोर्ड प्रशासनाच्या वतीने प्रारुप मतदार यादी तयार करण्यात आली आहे, या यादीमध्ये नवीन मतदारांची नोंद झाल्यावर अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे तसेच परवानगी न घेता केलेले बांधकामे केलेल्यांची नावे मतदार यादी मधून कमी करण्यात आली आहे. मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी बोर्ड प्रशासनाकडे तब्बल 6 हजार 418 अर्ज दाखल झाले आहेत. प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या अर्जदारांचे (मतदारांचे) घरांची पाहणी करण्यात येणार आहे. अर्जदारांच्या घरांची पाहणी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने 20 कर्मचारी नियुक्त केले आहेत. कर्मचाऱ्यांच्या अहवालानुसार नवीन मतदारांची नोंद करण्यात येणार असून सर्व आलेल्या अर्जांची छाननी, पडताळणी करण्यात येणार आहे. पडताळणी झाल्यावर 13 आणि 14 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्यानंतर बोर्डाचे अध्यक्ष डी. जी. पटवर्धन यांच्या आदेशानुसार अंतिम मतदार यादी मध्ये मतदारांची नोंद होणार आहे.
वार्ड क्रमांक 1 – 1934
वार्ड क्रमांक 2 – 3504
वार्ड क्रमांक 3 – 4086
वार्ड क्रमांक 4 – 2552
वार्ड क्रमांक 5 – 2566
वार्ड क्रमांक 6 – 3122
वार्ड क्रमांक 7 – 1342
वार्ड क्रमांक 8 – 3650
——–
एकूण 22756
वार्ड क्रमांक 1- 568
वार्ड क्रमांक 2 – 720
वार्ड क्रमांक 3- 1190
वार्ड क्रमांक 4- 1410
वार्ड क्रमांक 5- 614
वार्ड क्रमांक 6- 896
वार्ड क्रमांक 7- 377
वार्ड क्रमांक 8- 643
——–
एकूण 6418