

पुढारी ऑनलाइन डेस्क : तुम्ही मला हिंदू म्हणायलाच हवे, असे केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटले आहे. एएनआयने आरिफ यांचे दोन 'कोट' ट्विट केले आहे. त्यात आरिफ यांनी म्हटले आहे की त्यांना हिंदू असेच म्हणावे.
ट्विटमध्ये म्हटले आहे की, केरळचे राज्यपाल सर सय्यद अहमद खान एकदा म्हणाले होते की मला हिंदू ही धार्मिक संज्ञा वाटत नाही, ती भौगोलिक संज्ञा आहे. जो कोणी भारतात जन्माला आला आहे, भारतात उगवलेले अन्न खातो किंवा भारतीय नद्यांचे पाणी पितो तो हिंदू म्हणण्यास पात्र आहे.
पुढे ट्विटमध्ये दिले आहे, तुम्ही मला हिंदू म्हणायलाच हवे… वसाहती काळात हिंदू, मुस्लिम आणि शीख अशा संज्ञा वापरणे अगदी योग्य होते कारण ब्रिटिशांनी नागरिकांच्या सामान्य अधिकारांचा निर्णय घेण्यासाठी समुदायांना आधार बनवले होते.