Katrina Kaif : मिनी स्कर्टवर ‘कॅट’ थिरकली… व्हिडिओ व्हायरल

Katrina Kaif : मिनी स्कर्टवर ‘कॅट’ थिरकली… व्हिडिओ व्हायरल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेली कॅटरिना कैफ (Katrina Kaif) ही तिच्या आगामी चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. 'फोन भूत' हा तिचा आगामी नवा सिनेमा आहे. सिनेमाची रिलीज डेट जवळ येत आहे, त्यामुळे 'फोन भूत'ची संपूर्ण टीम सध्या प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. कॅटरिना, ईशान आणि सिद्धांत हे तिघेही वेगवेळ्या इवेंट्समध्ये दिसून येत आहेत. तिघेही त्यांच्या या आगामी सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. एका कार्यक्रमात हे तिघेही एकत्र दिसून आले. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कॅटरिना कैफ वेगळ्या अंदाजात दिसून आली, कॅटचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडला.

गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आपल्या विविध छटा दाखवणारी कॅटरिना कैफ दीर्घ कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तिचा 'फोन भूत' हा हॉरर कॉमेडी चित्रपट काही दिवसांतच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. 'फोन भूत'च्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचणाऱ्या कॅटरिनाने यावेळी आपली अनोखी पण रंजक शैली दाखवून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. खरंतर, यावेळी तिने असं काहीसं केलं आहे, ज्यामुळे कॅटरिनाला 'पंजाबी बहू' म्हटले जात आहे.

इंस्टाग्रामवर 'फोन भूत'च्या प्रमोशनदरम्यानचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती पंजाबी ढोलवर नाचताना दिसून आली. सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर या दोघांनी ढोलवर ताल धरत भांगडा नृत्य सुरू केले. या दोघांना ढोलवर भांगडा करताना पाहून कॅटरिना कैफला देखील नाचण्याचा मोह आवरला नाही. तिने देखील भांगडा या नृत्य करत ताल धरला. शॉर्ट ड्रेस आणि हाय हिल्समध्ये तिचा भांगडा खूपच प्रसिद्ध झाला.

या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्वजण तिचे हे नृत्य आणि तिचा लुक बघतच राहिले. कॅटरिनाचे असे रूप लोकांनी पहिल्यांदाच पाहिला. सोशल मीडियावर तिचे हे नृत्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर अनेक चाहत्यांनी कमेंट देखील केली आहे. तिने धरलेला भांगडाचा तालावर एक कमेंट आली आहे की, विकी कौशलसारख्या गब्रू पंजाबीशी लग्न केल्यानंतर कॅटरिनावर त्याचा रंग चढणे अपरिहार्य होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news