संग्रहित छायाचित्र
Latest
Kashmiri Pandit : संतापजनक…काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग, काश्मीरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या
पुढारी ऑनलाईन डेस्क : काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंगचा संतापजनक प्रकार घडला आहे. दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये अंदाधूंद गोळी करत काश्मीरी पंडित नागरिकाची ( Kashmiri Pandit ) हत्या केली.
दक्षिण काश्मीरमधील शोपियानमधील छोटेपोरा परिसरातील आज सकाळी दहशतवादी सफरचंदाच्या बागेत आले. येथे त्यांनीअंदाधूंद गोळीबार केला. यामध्ये काश्मीरी पंडित सुनील कुमार भट्ट यांचा मृत्यू झाला. तर सुनील कुमार यांचा भाउ गंभीर जखमी झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून, शाोध माोहिम तीव्र करण्यात आली आहे

