

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकमधील (Karnataka) तुमकुरू जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर जीप आणि ट्रकच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात तीन मुलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ११ जण जखमी झाले आहेत. हे सर्व रोजंदारी कामगार असून ते बंगळूरकडे चालले होते. एसपी राहुलकुमार शाहपूरवाड यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.
रोजंदारी कामगार रायचूरहून बंगळूरच्या दिशेने टेम्पो ट्रॅव्हलरमधून जात असताना पहाटेच्या सुमारास सिरा तालुक्यातील कल्लंबेल्लाजवळ बलेनानहल्ली गेट येथे एका ट्रकने टेम्पोला धडक दिली. टेम्पोमधून २० हून अधिक जण प्रवास करत होते, असे सांगण्यात येत आहे. त्यापैकी बहुतांश रायचूर जिल्ह्यातील विविध भागांतील स्थलांतरित मजूर आहेत. जे कामासाठी बंगळूरला जात होते. दोन जखमी प्रवाशांना बंगळूरला उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. बाकीच्यांवर तुमकुरू येथे उपचार सुरू आहेत, अशी माहिती तुमकुरू जिल्ह्याधिकारी वाय एस पाटील यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना PMNRF योजेनेअंतर्गत (Prime Minister's National Relief Fund) प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमी लोकांना प्रत्येकी ५०,००० देण्याची घोषणा केली आहे.
हेही वाचलंत का?