

[visual_portfolio id="266605"] पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान पुन्हा एकदा आई होणार असल्याच्या बातमीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि एकच चर्चा रंगू लागली. करीना कपूर तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याची चर्चा हऊ लागली. कारण एका व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तिचे बेबी बंप दिसून आले. नेटकऱ्यांनीही तसा अंदाज लावला. पण, खरा धक्का आता बसला, जेव्हा सैफने आणि करीनाने ती प्रेग्रेंट नसल्याचा खुलासा केला.
नेटकऱ्यांनी अंदाज लावला की, करीना तिसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे. पण, या सर्व अफवावंर सैफने स्पष्ट केलं की, ती प्रेग्नेंट नाही.
करीना कपूरने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये सांगितलं की, ती प्रेग्नेंट नाही. हे सर्व पास्ता आणि वाईनमुळे झालं आहे. करीना कपूरने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलंय, "हे पास्ता आणि वाईन आहे. शांत व्हा. मी प्रेग्नेंट नाही. उफ्फ्फ… यामध्ये सैफने म्हटलं की, त्याने आधीच देशाची लोकसंख्या वाढवण्यात योगदान दिलंय. एन्जॉय KKK".
करीना कपूरने आपल्य या पोस्टाच्या माध्यमातून स्पष्ट केलं की, ती प्रेग्नेंट नाही. लोक हे खूप मजेशीरपणे घेत आहेत. ही कॅप्शन लिहिताना करीनाने दोन स्माईली इमोजी शेअर केले आहेत. मात्र, करिनाची गोष्ट शेअर करण्याआधीच अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीवर मीम्सचा पूर आला. काही यूजर्स अजूनही करीना कपूरवर मीम्स शेअर करत आहेत.