

कराड : पुढारी वृत्तसेवा कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात खोडशी ता. कराड येथील सकल मराठा समाजाकडून मनोज जरांगे-पाटील यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. त्यानुसार मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्व राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदचा बॅनर लावल आहे. यामुळे कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मनोज जरांगे-पाटील यांनी २५ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र सरकारला मराठ्यांना आरक्षण देण्याचा अल्टिमेट दिला आहे. त्यामुळे मनोज जरांगे-पाटील अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी सभा घेत आहेत. आरक्षणाची मागणी अनेक वर्षांपासून मराठी समाज करत आहे. त्यामुळे मराठा समाजाने आरक्षणाचा लढा तीव्र केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज पेटून उठला असून, महाराष्ट्रातील अनेक गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीचे बॅनर लावले आहेत.
दरम्यान आरक्षणामुळे अनेकांना शिक्षण, तसेच नोकऱ्यांमध्ये फायदा होणार आहे. आरक्षण मिळवण्यासाठी मराठ्यांनी एकत्र येत एक मराठा लाख मराठा घोषणा देत अनेक मोर्चे आंदोलने केली आहेत. आरक्षणासाठी मराठा समाजातील अनेक युवकांनी स्वतःचा जीव सुद्धा दिलेला आहे. दरम्यान कराड तालुक्यातील कराड दक्षिण मतदार संघात खोडशी या गावात सकल मराठा समाजाकडून जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला गावात प्रवेश बंदचा बॅनर मनोज जरांगे पाटील यांच्या फोटोसह लावला आहे. कराड दक्षिण मतदार संघातून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण निवडून आले आहेत. यामुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :