

पुढारी ऑनलाईन डेस्क : जनतेची इच्छा असेल तर आणि भाजपने उमेदवारी दिली तर २०२४ ला मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवेल, असे मत अभिनेत्री कंगना राणावतने मांडले होते. यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी कंगनाला प्रत्युत्तर दिले आहे. जे.पी.नड्डा यांनी कंगनाचे भाजपमध्ये स्वागत असल्याचे म्हटले आहे.
आम्हाला निश्चितपणे वाटते की, कंगना राणावतने राजकारणात सक्रिय व्हावे. कंगना पंतप्रधान मोदींच्या कार्याने प्रभावित आहे. त्यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत आहे. कंगनाला उमेदवारी देण्याबाबत पक्ष निर्णय घेईल. आम्ही कोणालाही शब्द देऊन पक्षात घेत नाहीत, असे जे.पी.नड्डा यांनी स्पष्ट केले आहे. कंगनाकडे कोणती जबाबदारी सोपवण्यात येईल, याचा निर्णय पक्ष घेईल, असेही नड्डा म्हणाले.