

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि तिचा पती आयुष शर्मा यांनी त्यांच्या घरी रमजान ईदच्या निमित्ताने खास पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकारांनी उपस्थिती लावली आहे. दरम्यान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बॉलिवूडची क्विन कंगना राणावतने ( Kangana Ranaut ) दिमाखात हजेरी लावली. मात्र, कंगनाच्या उपस्थितीमुळे चाहत्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली.
अर्पिता खानच्या ईद पार्टीत बी-टाउनपासून ते छोट्या पडद्यापर्यंत जवळपास सर्वच सेलिब्रिटी रेड कार्पेटवर उतरले. दरम्यान, बॉलिवूडची क्वीन कंगना राणावतही ( Kangana Ranaut ) यात दिमाखात सहभागी झाली. यात कंगनाने ऑलिव ग्रीन कलरचा शरारा परिधान करून चारचाँद लावलेत. केसांची स्टाईल, कानात इअररिग्स, हेवी डिझाईन असलेला दुपट्टा, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केलाय. कंगनाचा हा पारंपारिक लूक पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.
एकिकडे कंगनाच्या लूकचे चाहते कौतुक करताना थकत नाहीत. तर दुसरीकडे कंगनाला नेटकरी ट्रोलही करत आहेत. दरम्यान एका युजर्सने मागील पार्टीची आठवण काढत 'कंगना रोज खान कुटूबियांबद्दल उलटसुलट बोलत असते, आता ती पार्टीला कशी गेली' असे म्हटलं आहे. दुसर्या एका युजरने 'ज्याच्याबद्दल तुम्ही रोज अपशब्द बोलता, निंदा करता त्याच्यात पार्टीत सहभागी होता कसे काय? असे म्हटलं आहे. यावरून सलमान आणि कंगनाच्या मागे झालेला वादाची पुन्हा एकदा आठवण चाहत्यांना झाली आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कंगनाकडे 'इमर्जन्सी' आणि 'चंद्रमुखी २' चित्रपट आहे.
हेही वाचा :
( viralbhayani instgram वरून सांभार )