

पुढारी ऑनलाइन डेस्क : J&K Earthquake : जम्मू आणि काश्मीरच्या कटरा येथे आज रविवारी पहाटे पुन्हा 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. NCS ने ट्विट करून याची माहिती दिली. आज पहाटे 3:50 वाजता भूकंप झाला." तीव्रतेचा भूकंप: 4.1, 18-06-2023 रोजी झाला, 03:50:29 IST, अक्षांश: 32.96 आणि लांब: 75.79, खोली: 11 किमी , स्थान: 80km कटरा, जम्मू आणि काश्मीर, भारत."
जम्मू-काश्मीर आणि जवळच्या भागात 24 तासांत तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हे धक्के लडाखमध्येही जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.5 इतकी मोजण्यात आली आहे. लेह, लडाखच्या ईशान्येकडील 271 किमी अंतरावर रात्री 9:44 वाजता भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली आहे. J&K Earthquake
तिन्ही भूकंपांचा केंद्रबिंदू जम्मूमधील असल्याची माहिती समोर आली आहे. पहिला भूकंप रामबनमध्ये होता आणि आता तत्पूर्वी आज रामबनमध्येही भूकंप झाला होता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्याची तीव्रता 3.0 होती. हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दुपारी 2.03 च्या सुमारास भूकंप झाला.नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS)
दुसरा भूकंप रात्री 9.44 वाजता झाला. त्याची तीव्रता 4.5 इतकी होती. हा भूकंप जम्मू काश्मीरच्या डोडा येथे झाला. त्यानंतर आज पहाटे जम्मू काश्मीरच्या कटरा भागात पहाटे 4.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. कटरा भागातच श्री वैष्णो देवीचे क्षेत्र आहे. सुदैवाने तिन्हीपैकी कोणत्याही भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. J&K Earthquake ही देशातील भूकंप क्रियाकलापांवर देखरेख ठेवणारी भारत सरकारची नोडल एजन्सी आहे.
हे ही वाचा :