

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor ) तिच्या हटके स्टाईल आणि ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. जान्हवी नेहमी सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेअर करून सक्रिय असते. सध्या जान्हवीने स्टायलिश फोटोशूट करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
जान्हवी कपूरने ( Janhvi Kapoor ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर वाईन कलरचा डिप नेक ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत जान्हवी हटके अंदाजात आणि स्टायलिश लूकमध्ये खूपच सुंदर दिसतेय. जान्हवीचा बॅकलेस ड्रेसमध्ये हॉट अवतार चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. जान्हवीच्या मोकळ्या केसांसह मेकअपने तिच्या सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. यातील काही फोटोंनी पोझ देताना जान्हवीने आपल्या मोकळ्या केसांना हात लावला आहे.
कलरफूल फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'शनि ग्रह', 'चांदणी' आणि 'ऑक्टोपस'चा ईमोजी शेअर केले आहेत. तर ब्लॅक ॲन्ड व्हाईट फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'it takes an army ????♀️ and I have the best hehe ?', असे लिहिले आहे. हे फोटोशूट करताना जान्हवीचा बॅकलेस ड्रेस व्यवस्थित करताना आर्टिस्ट दिसत आहेत. या हॉट अवतारात जान्हवी खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसतेय. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
सोशल मीडियावर हे फोटो शेअर होताच चाहत्यांसह बॉलिवूड स्टार्संनी भरभरून कॉमेन्टसचा पाऊस पाडत आहेत. यात बॉलिवूड अभिनेत्री सुहाना खानने प्रतिक्रिया दिली आहे. एका युजर्सने 'डिस्को दीवानी', 'कॅज्युअल संडे लुक, 'हॉटनेसचा ओव्हरलोडेड?.' 'जेव्हाही मी तुला पाहतो तेव्हा पाहतच राहतो. 'ब्युटी क्वीन ऑफ फिल्म इंडस्ट्री.' यासारख्या अनेक कॉमेंन्टस केल्या आहेत.
दुसऱ्या एका युजर्सने 'Gorgeous ??', 'Nice', 'Very Beautiful'. असे म्हटले आहे. याशिवाय काही चाहत्यांनी जान्हवीच्या फोटोंवर हार्ट आणि फायरचा ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोंना आतापर्यंत ६ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
जान्हवी कपूरच्या चित्रपट करिअरबद्दल बोलायचे झाले तर, ती 'दोस्ताना २' आणि 'गुड लक जेरी' या चित्रपटात दिसणार आहे. जान्हवीची बहीण खुशी कपूरही बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ती दिग्दर्शक झोया अख्तर यांच्या 'द आर्चीज' चित्रपटात दिसणार आहे.
हेही वाचलंत का?