

पुढारी ऑनलाईन : राष्ट्रीय तपास यंत्रणेने आज देशात छापेमारी आणि शोधमोहीम (Jammu and Kashmir) सुरू केली आहे. आज सकाळपासून तामिळनाडूनंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये देखील NIA ने दहशतवादविरोधी धडक कारवाई करत शोधमोहीम सुरू केली आहे. NIA ने जम्मू-काश्मीरमधील १५ ठिकाणी दहशतवादविरोधी शोधमोहीम सुरू केली आहे.
या शोधमोहिमेत NIA ने पाकिस्तान समर्थित दहशतवादी कट प्रकरणातील जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) शोपियान (३), अनंतनाग (४), बडगाम (२), बारामुल्ला (१), श्रीनगर (२), पूंछ (२) आणि राजौरी (१) जिल्ह्यांमधील अशा १५ ठिकाणी शोधमोहीम आज सकाळपासून सुरू केल्या आहेत.
तामिळनाडूत सुद्धा 'NIA'ने आज (दि.०९) पुन्हा PFI विरोधी शोधमोहीम सुरू केली आहे. तामिळनाडूतील मदुराई, चेन्नई, दिंडीगुल आणि थेनी जिल्ह्यातील सहा ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (National Investigation Agency) पीएफआय संदर्भात (PFI) शोध घेण्यात येत आहे. यामध्ये आज NIA ने तामिळनाडूतील दिंडीगुल जिल्ह्यातील पझनी येथून प्रतिबंधित संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या मदुराई क्षेत्रीय अध्यक्ष मोहम्मद कैसर याला ताब्यात घेतले आहे. याचबरोबर NIA ने जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) देखील शोधमोहीम सुरू केली आहे.