संतापजनक..! फलकावर ‘जय श्री राम’ लिहिल्याने शिक्षकाने केली विद्यार्थ्याला मारहाण

Jammu and Kashmir
Jammu and Kashmir
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे शिक्षिकेने वर्गातील मुलांना मुस्लीम विद्यार्थ्यास कानशिलात लावण्यास सांगितल्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर व्‍हायरल हाेत आहे. या घटनेवर अनेकांनी तीव्र संताप व्‍यक्‍त केला आहे. आता जम्मू-काश्मीरमध्ये असाच प्रकार समोर आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कठुआ जिल्ह्यात शिक्षकाने वर्गाच्या फलकावर 'जय श्री राम' लिहिल्‍याने  विद्यार्थ्याला मारहाण केली आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे, असे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे. (Jammu and Kashmir)

जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत हा प्रकार घडला. रुग्णालयात दाखल केलेल्या विद्यार्थ्याने सांगितले की, त्याने वर्गाच्या फलकावर "जय श्री राम" लिहिल्यामुळे त्‍याला शिक्षकाने मारहाण झाली. पोलिसांनी आरोपी शिक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापकांविरुद्ध भारतीय दंड संहितेतील कलम 323, 342, 504, 506 आणि बाल न्यायाच्या कलम 75 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Jammu and Kashmir)

कठुआ येथील घटनेनंतर उपायुक्तांनी अधिसूचना जारी करून चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केल्याचे सांगितले. सदस्यांमध्ये बानीचे उपविभागीय दंडाधिकारी, कठुआचे उपमुख्य शिक्षण अधिकारी आणि खरोटे येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक यांचा समावेश आहे.

उत्तर प्रदेशमध्ये काय घडलं ?

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील एका शाळेतील मुलाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक शिक्षिका वर्गातील मुलांना दुसऱ्या एका मुस्लिम मुलाला कानशिलात मारण्यास सांगत असल्याचे दिसते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी शिक्षिकेविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३ आणि ५०४ नुसार गुन्‍हा दाखल झाला आहे.  मुलाला गुणाकार येत नसल्याने त्याला शिक्षा म्हणून मारहाण करण्यास सांगण्यात आले होते. दरम्यान, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी या व्हायरल व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. (Jammu and Kashmir)

या घटनेवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, "निरागस मुलांच्या मनात भेदभावाचे विष पेरले जात आहे. शाळेसारख्या पवित्र ठिकाणी द्वेषाचे वातावरण तयार होत आहे. भाजपने हे द्वेषाचे वातावरण तयार केले असून, ते देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहे. मुले हे भारताचे भविष्य आहेत. त्यांच्यात द्वेष निमार्ण करू नका, आपण सर्वांनी मिळून प्रेम शिकवायचे आहे." दरम्यान, त्या शिक्षिकेने तिच्या कृत्यावर माफी मागितली आहे. तिने हा व्हायरल व्हिडिओ दिशाभूल करणारा असून व्हिडिओत छेडछाड करण्यात आल्याचा दावा आहे. (Jammu and Kashmir)

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news