जळगाव : स्वातंत्र्याचा सुर्य पाहिलेल्या 103 वर्षांच्या आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क

जळगाव : तांबोळे खुर्द येथील वयोवृद्ध मतदार वय 103 वर्ष (जन्म वर्ष 1921) यांचे होम वोटिंग द्वारे मतदान करून घेण्यात आले.
जळगाव : तांबोळे खुर्द येथील वयोवृद्ध मतदार वय 103 वर्ष (जन्म वर्ष 1921) यांचे होम वोटिंग द्वारे मतदान करून घेण्यात आले.
Published on
Updated on

जळगाव जिल्ह्यातील 'होम वोटिंग' सुविधा मतदानाचा आज शेवटचा दिवस

जळगाव : पुढारी वृत्तसेवाजळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघात ज्यांना वयांमुळे, व्याधीमुळे, अपंगत्वामुळे मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य नाही अशा मतदारांना आरोग्य विभागाने पात्र ठरवलेल्यांना एकूण 1504 जणांना 'होम वोटिंग' ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शनिवार (दि.४) संध्याकाळ पर्यंत प्राप्त माहितीनुसार 731 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. तर शुक्रवारी (दि.३) 52 जणांनी हक्क बजावला होता. उर्वरित उपलब्ध लोकांसाठी रविवार (दि.५) मतदान होईल अशी माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेनी दिली आहे. (Fifty two people vote on first through home voting)

103 वर्षाच्या आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क
चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे ( खुर्द ) या गावातील 103 वर्षाच्या धोडगीर शंकर गोसावी यांच्या घरी जाऊन निवडणूक यंत्रणेनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार त्यांचा मतदानाचा हक्क मिळवून दिला. धोडगीर शंकर गोसावी यांचा जन्म 1921 चा असून त्यांनी स्वातंत्र्य भारताचा सूर्योदय पाहिला आहे. भारताच्या पहिल्या निवडणुकी पासूनचे ते साक्षीदार असल्यामुळे त्यांचा मतदार म्हणून मत करतांनाचा फोटो स्वातंत्र्याचे मोल सांगून जातो. (home voting)

शनिवार (दि.४) जळगाव लोकसभा निवडणुकीचे सर्व सामान्य निरीक्षक राहुल गुप्ता यांनी जळगाव मधील होम सुविधा उपलब्ध असलेल्या पहिल्या ज्येष्ठांना प्रमाणपत्र दिले. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही घरी जाऊन ज्येष्ठांच्या ' होम वोट (home voting) सुविधेची पाहणी केली. निवडणूक यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांनी ' होम वोटिंग सुविधा ' उपलब्ध करून दिली. शनिवार (दि.४) संध्याकाळ पर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारी नुसार तालुकानिहाय खालील प्रमाणे होम वोटिंग झाले. रावेर-100, मुक्ताईनगर-106, भुसावळ-107, जळगाव शहर-107, जामनेर-84, चाळीसगाव 76, जळगाव (ग्रामीण)-108, एरंडोल – 116 आणि चोपडा-43 असे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news