कुणी मंदिरात प्रवेश केल्याने भ्रष्ट होईल इतका आपला धर्म कमकूवत नाही : राज ठाकरे

राज ठाकरे
राज ठाकरे
Published on
Updated on

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

त्र्यंबकेश्वरमधील विषय हा तिथल्या स्थानिकांचा विषय आहे. बाहेरच्यांनी त्यात पडण्याची गरज नाही. त्यासंदर्भात तेथील स्थानिक नागरिकांनी निर्णय घ्यायला हवा. तसेच वर्षानुवर्ष एखादी पंरपरा सुरु असेल तर ती थांबविणे योग्य नसल्याचे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच इतर धर्माचा माणूस मंदिरात आल्याने लगेच भ्रष्ट होईल इतका कमकुवत धर्म आहे का आपला? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्र्यंबकेश्वर येथे धूप दाखविण्याच्या प्रथेवरुन निर्माण झालेल्या वादावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरे म्हणाले, देशात असे अनेक मंदिरे व मशिदी आहेत जिथे एकमेकांमध्ये सामंजस्याची भूमिका आहे. माहिमच्या दर्ग्यावर जेव्हा चादर चढवली जाते तेव्हा माहिम पोलिस्टेशनचा कॉन्स्टेबल ती चढवतो. अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे इतर धर्माचा माणूस आपल्या मंदिरात आला तर लगेच भ्रष्ट होईल इतका आपला धर्म कमकूवत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. उलट आपल्याच काही मंदिरामध्ये विशिष्ट जातीतल्या लोकांनाच दर्शन घेऊ दिलं जातं असेही आहे.  याआधी मीही अनेक मशिदींमध्ये, दर्ग्यांमध्ये गेलो आहे. यातून माणसांची वृत्ती कळते असे ठाकरे म्हणाले.

ज्या गोष्टी चुकीच्या घडतील तिकडे प्रहार करणे गरजेचे आहे. मात्र, काहीतरी जाणीवपूर्वक करणे योग्य नाही. हे सगळं करुन कुणाला दंगली हव्या आहेत का? लाऊडस्पीकरचा विषय, समुद्रातील अनधिकृत दर्गे, गडकिल्यांवरील दर्गे या गोष्टी थांबविल्याच पाहीजे. जिथे मराठी मुस्लिम राहतात तिथे कधी दंगली होत नाही. महाराष्ट्र पोलिसांना 48 तास द्या दंगलीच्या घटना घडणार नाही. जिथे हिंदू-मुस्लिम यांच्यात चांगले संबध आहे, सामंज्यस्य आहे ते लोकांनी बिघडवू नये असे ठाकरे म्हणाले.

नोटाबंदी सारखा निर्णय देशाला परवडणारा नाही

रिझर्व्ह बॅंकेने 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. या निर्णयावर राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.  नोटबंदीसारखा निर्णय देशाला परवडणारा नाही. तज्ज्ञांना विचारात घेऊन नोटाबंदीचा निर्णय घ्यायला हवा होता. अशा पद्धतीने प्रयोग करुन सरकार चालत नसल्याची टीका राज ठाकरे यांनी यावेळी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news