Israel Hamas War : भारतावर ‘हमास’सारखा हल्ला करु : खलिस्तानी दहशतवाद्याची वल्‍गना

Israel Hamas War
Israel Hamas War
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : खलिस्तानी दहशतवादी संघटना शिख फॉर जस्टिस (SFJ) प्रमुख  गुरपतवंत सिंग पन्नून याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. त्‍यामुळे त्‍याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धापासून धडा घ्‍यावा,  अन्यथा भारतावरही  'हमाससारखा हल्ला' करु अशी वल्‍गना केली आहे.

Israel Hamas War : …तर भारतावर हमाससारखा हल्ला करु

खलिस्तानी दहशतवादी  गुरपतवंत सिंग पन्नूनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ताे ४० सेकंदांचा आहे. त्यामध्ये त्‍याने म्‍हटले आहे की, भारताने इस्रायलमधील हमास हल्ल्यापासून धडा घ्यावा. आम्ही पंजाबला भारताचा भाग मानत नाही. तो स्वतंत्र करु. पॅलेस्टाईनकडून इस्रायलवर हल्ले होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यापासून धडा घेण्याची गरज आहे. इस्रायलच्या धर्तीवर भारताने पंजाबवर ताबा मिळवला आहे. भारताने पंजाबमध्ये अतिक्रमण सुरूच ठेवले तर नक्कीच याचे पडसाद उमटतील. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकार जबाबदार असेल."

दहशतवादी पन्नूने २०१९ पासून राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) रडारवर आहे. विशेष NIA न्यायालयाने ३ फेब्रुवारी २०२१ रोजी पन्नूनच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्याला गेल्या वर्षी २९ नोव्हेंबर रोजी "घोषित अपराधी" (PO) म्हणून घोषित करण्यात आले होते. शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अहमदाबाद येथे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामना होत आहे. हा सामना उधळून लावण्याची धमकीही यापूर्वी पन्नूने दिली हाेती.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news