

पुढारी ऑनलाइन डेस्क : Iran Hijab Protest : ईराणच्या उत्तरी तेहरानमधील तुरुंगात शनिवारी रात्री गोळीबारसह मोठी आग लागली. इराणामधील हे एक कुविख्यात तुरुंग आहे. इथे राजनितीक आणि विदेशी कैद्यांना ठेवण्यात येते. तसेच असे म्हटले जात आहे की हिजाब विरोधी आंदोलनात कैद केलेल्या आंदोलकांना याच तुरुंगात डांबून ठेवण्यात आले आहे.
Iran Hijab Protest : आईआरएनए समाचार एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आठ जण जखमी झाले आहेत. तर सध्या स्थिती नियंत्रणात आली आहे.
Iran Hijab Protest : हिजाब योग्य प्रकारे न घातल्याप्रकरणी 22 वर्षिय तरुणी महसा अमिनीला इराण पोलिसांनी ताब्यात घेतले होते. जिथे तिला प्रचंड यातना दिल्याने ती कोमात गेली. नंतर तिचा तीन दिवसांनी 16 सप्टेंबरला मृत्यू झाला. अमिनीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये या घटनेचा तीव्र निषेध सुरू झाला. नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले. हिजाब विरोधी हे आंदोलन गेल्या महिनाभरापासून सुरू असून दिवसेंदिवस तीव्र होत आहे.
ओल्सो स्थित ईरान ह्यूमन राइट्सद्वारा ट्विटर वर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत गोळीबारचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे. तसेच आगीच्या ज्वाळा आणि मोठ्या प्रमाणात धूर दिसत आहे.
Iran Hijab Protest : इराणच्या 1500tasvir नावाच्या एक सोशल मीडिया चॅनेल जे प्रदर्शन आणि पोलिस उल्लंघनावर नजर ठेवत आहे. त्यांनी ट्विटर वर म्हटले आहे. एविन तुरुंगात आग भडकली आहे आणि विस्फोट ऐकण्यात आले आहे.
तसेच व्हिडिओत 'तानाशाह की मौत' असे नारे देखिल ऐकू येत आहे. हा नारा अमिनीच्या मृत्यूनंतर भडकलेल्या आंदोलनातील विरोध प्रदर्शन करणा-या ना-यांपैकी मुख्य नारा आहे.
Iran Hijab Protest : ईराणच्या सरकारी मीडियाने एका वरिष्ठ सुरक्षा अधिका-याचा हवाल्याने म्हटले आहे की, तुरुंगात शनिवारी रात्री चकमक झाली आणि दंगा करणा-यांनी तुरुंगात आग लावली. घटनेत आठ जण घायाळ झाले तर सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
हे ही वाचा :