इराणमध्ये आता शाळकरी मुस्लिम मुलींचाही हिजाबला जोरदार विरोध | पुढारी

इराणमध्ये आता शाळकरी मुस्लिम मुलींचाही हिजाबला जोरदार विरोध

तेहरान, वृत्तसंस्था : इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनाचे लोण आता शाळकरी मुलींपर्यंत जाऊन पोहोचले आहे. देशातील तेहरान विद्यापीठासह 15 विद्यापीठांतील युवक-युवती हिजाब सक्तीचा कायदा करणार्‍या आयातुल्ला खोमेनी या सर्वोच्च इराणी मुस्लिम धर्मगुरूविरोधी घोषणा देत आहेत.

विद्यापीठांतून सुरू असलेले हे आंदोलन आता शाळांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. इराणमधील 31 पैकी सुमारे 18 प्रांतांतील अनेक शाळांमधील मुलींनी खोमैनी सरकारविरोधात जोरदार निदर्शने बुधवारी केली. आंदोलन चिरडण्यासाठी अनेक तरुणींना ठार केल्यानंतरही ते थांबत नसल्याने खोमैनी सत्ताधारी गट अस्वस्थ बनला आहे. पोलिसांनी बुधवारीही 350 वर निदर्शकांना अटक केली.
मुलींना समजावण्यासाठी आलेल्या शिक्षणाधिकार्‍यांना मुलींनी घेराव घातला. त्यांच्या अंगावर पाण्याच्या बाटल्या फेकून मारल्या.

सहा देशांतून इराणी महिलांना पाठिंबा

अमेरिका, तुर्की, बेल्जियम, स्पेन, फ्रान्स, नेदरलँडमध्ये त्या त्या देशांतील महिलांनी इराणी महिलांना पाठिंबा म्हणून निदर्शने केली.

Back to top button