IPL : आयपीएल उद्घाटनात थिरकणार वलयांकित तारेतारका

IPL : आयपीएल उद्घाटनात थिरकणार वलयांकित तारेतारका
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : IPL : आयपीएल 2023 सुरू होण्यास आता काही दिवसच राहिले आहेत. येत्या 31 मार्च रोजी आयपीएलचा बिगुल वाजणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला रश्मिका मंदाना, तमन्ना भाटिया, टायगर श्रॉफ, कॅटरिना कैफ आणि अर्जित सिंह हे सेलिब्रिटी आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात आपली कला सादर करणार आहेत. दरम्यान, कोरोनाची लाट ओसरल्यामुळे यावेळी आयपीएलच्या चाहत्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे.

यंदाच्या मोसमातील पहिला सामना गुजरात जायंटस विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी आयपीएल उद्घाटनाचा रंगारंग कार्यक्रम होणार असून अनेक सेलिब्रिटी थिरकणार आहेत. कोरोना महासाथीची लाट ओसरल्यानंतर जवळपास तीन वर्षानंतर आयपीएलमध्ये होम आणि अवे या फॉरमॅटमध्ये स्पर्धा होणार आहे. आयपीएलचा सामना सुरू होण्यापूर्वी नेत्रदीपक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात हजेरी लावणार्‍या सेलिब्रेटींच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.

IPL : 'नाईट क्लब'अ‍ॅप लॉन्च

कोलकाता नाईट रायडर्सचा सह-मालक शाहरुख खानने एका मजेदार व्हिडीओसह मनाईट क्लब अ‍ॅपफ लॉन्च केला आहे. मएकदम फटाफटी अ‍ॅपफ अशी त्याची टॅगलाइन आहे. केकेआर संघाबद्दल ताजी माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचत राहावी, यासाठी हा अ‍ॅप लाँच करण्यात आला आहे. अ‍ॅपमध्ये एक गेम झोनदेखील असेल. त्या ठिकाणी चाहते मॅच-डे गेममध्ये भाग घेऊ शकतात. अ‍ॅपमध्ये एक मेगास्टोअरदेखील समाविष्ट करण्यात आले आहे. त्याद्वारे चाहते केकेआर संघाला त्यांचा पाठिंबा दर्शवू शकतात.

IPL : चेन्नईला धक्का; स्टोक्स अनफिट

इंडियन प्रीमियर लीगच्या 2023 चा हंगाम सुरू होण्याच्या काही दिवस आधी चेन्नईला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स गुडघ्याच्या दुखापतीमुळे मोसमाच्या सुरुवातीला गोलंदाजीसाठी तंदुरुस्त असणार नाही. ही माहिती संघाचे प्रशिक्षक मायकेल हसी यांनी दिली आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे बेन स्टोक्स त्रस्त होता. मात्र दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर इंग्लंडच्या कसोटी संघाच्या कर्णधाराने आपण आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सांगितले होते.

IPL : कुठे होणार लाइव्ह स्ट्रिमिंग?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आयपीएल 2023 च्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. त्याशिवाय जिओ सिनेमा अ‍ॅपवर त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्याची सोय उपलब्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news