Virat Kohli Record : आणखी एक ‘विराट’ किर्तीमान….. कोहली@7500 | पुढारी

Virat Kohli Record : आणखी एक 'विराट' किर्तीमान..... कोहली@7500

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा स्टार फलंदाज आपल्या आक्रमक खेळीमुळे प्रसिद्ध आहे. त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटने आपल्या नावावर केला आहे. त्याने राजस्थानविरूद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना त्याने आज 7500 धावा पूर्ण केल्या. (Virat Kohli Record)

विराटच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद

विराट कोहली आयपीएलमधील 242 वा सामना राजस्थानविरुद्ध खेळत आहे. त्याने 2008 मध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून तो आरसीबीकडून खेळत आहे. 2016 च्या मोसमात विराटने अप्रतिम फलंदाजी केली आणि या कालावधीत एकूण 973 धावा करत विक्रम आपल्या नावावर केला होता. त्या मोसमात कोहलीने 4 शतके आणि 7 अर्धशतके झळकावली होती.

विराट कोहली आरसीबीचा कर्णधारही राहिला आहे. 2016 साली त्याने आपल्या नेतृत्वात संघाला अंतिम फेरीत नेले. मात्र, अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आरसीबी संघाचा पराभव झाला. कोहलीने संपूर्ण हंगामात ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्याने जवळपास एकहाती संघाला चॅम्पियन बनवले. अंतिम सामन्यात आरसीबी संघाने 208 धावांच्या लक्ष्यासमोर 200 धावांपर्यंत मजल मारली होती, परंतु तरीही संघाने सामना गमावला.

Back to top button