CSK vs SRH : धोनीला मिळणार विश्रांती! कोण होणार CSK चा कर्णधार?

CSK vs SRH : धोनीला मिळणार विश्रांती! कोण होणार CSK चा कर्णधार?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : CSK vs SRH Probable Playing XI : आयपीएलचा 29 वा सामना आज म्हणजेच शुक्रवारी (दि. 21) चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यात सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीला विश्रांती मिळण्याची दाट शक्यता आहे. तो यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे.

सीएसकेचा पुढील सामना रविवारी आहे. अशा परिस्थितीत बॅक टू बॅक मॅच टाळण्यासाठी धोनी विश्रांती घेऊ शकतो. धोनीच्या अनुपस्थितीत डेव्हॉन कॉनवे यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळेल, पण संघाचा कर्णधार कोण होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

सीएसकेचे नेतृत्व बेन स्टोक्स किंवा रवींद्र जडेजा यांच्याकडे सोपवले जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या मोसमात जडेजाकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, पण तो ही जबाबदारी पार पाडू शकला नाही, त्यामुळे त्याने हंगमाच्या मध्यावर पुन्हा धोनीकडे जबाबदारी सोपवली.

दरम्यान, बेन स्टोक्स या यंदाच्या हंगामात दुखापतीमुळे हैराण झाला होता. पण हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी, स्टोक्सने नेटमध्ये सराव करून घाम गाळला. ज्यामुळे तो आजचा (दि. 21) सामना खेळू शकेल अशी जोरदार चर्चा आहे. जर धोनीने विश्रांती घेतल्यास स्टोक्स सीएसकेचा कर्णधार असेल असेही बोलले जात आहे.

सीएसकेचा संभाव्य संघ :

डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी/आरएस हंगेरगेकर, तुषार देशपांडे, महेश तिक्षणा, मथिशा पाथीराना/बेन स्टोक्स, आकाश सिंग

एसआरएचचा संभाव्य संघ :

हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, आदिल रशीद/अकील हुसेन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, मयंक मार्कंडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news