

मोगादिशू : सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये शिक्षण मंत्रालयाच्या बाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात 100 ठार तर 300 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. इस्लामी दहशतवादी संघटना अल-शबाबने हा हल्ला केल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष हसन शेख मोहम्मद यांनी केला.
दोन मोटारींमध्ये हा स्फोट झाला. यामध्ये महिला, वृद्धांसह अनेक मुलांचा मृत्यू झाला. पहिला स्फोट शिक्षण मंत्रालयाबाहेर उभ्या असणार्या मोटारीत झाला. त्यानंतर मदत करण्यासाठी काही लोक जमा झाले. घटनास्थळी शववाहिका आणि बचाव पथके दाखल झाल्यानंतर दुसर्या मोटारीत स्फोट झाला. दुसरा स्फोट झाल्यानंतर रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडला असल्याचे दिसले, असे जखमी झालेल्या एकाने सांगितले.