रॉकेट हल्ला : काबूल विमानतळाजवळ रॉकेट हल्ला, दोन ठार

काबूल विमानतळाजवळ रॉकेटने हल्ला, दोन ठार
काबूल विमानतळाजवळ रॉकेटने हल्ला, दोन ठार
Published on
Updated on

काबूल; पुढारी ऑनलाईन : अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील विमानतळाजवळ रविवारी रॉकेटने हल्ला करण्यात आला. विमानतळाजवळील निवासी क्षेत्र असलेल्या गुलाई येथील एका घरावर रॉकेट हल्ला झाल्यानंतर धुराचे लोट पसरले होते. या हल्ल्यात दोन जण ठार झाले असून तीन जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे.

तालिबान्यांनी अफगाणिस्तान काबीज केल्यापासून अफगाणिस्तानात गोंधळाचे वातावरण आहे. अनेक नागरिक देश सोडून बाहेर जात आहेत. त्यामुळे गेले आठवडाभर काबूल विमानतळाबाहेरची गर्दी कायम आहे. अमेरिकन लष्कर आणि नाटोच्या सैन्याच्या नियंत्रणाखाली काबूल विमानतळावरील उड्डाणे होत आहे.

तीन दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवारी सायंकाळी काबूल येथील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन आत्मघातकी हल्ले झाले. एकापाठोपाठ एक झालेल्या दोन बॉम्बस्फोटात ७० हून अधिक जण ठार झाले. तर २०० हून अधिक जण जखमी झाले होते.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या बाहेर इसिस कडून हल्ला करण्यात आला. यात १३ अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला. इतर १८ सैनिक जखमी झालेत. दुसरीकडे इसिस या दहशतवादी समहुाने टेलीग्राम अकाउंटवर काबूल विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी घेतलीय.

स्फोटानंतर अनेक मृतदेह विमानतळाशेजारील मोठ्या गटारीत पडल्याचे आढळून आले. काही जखमीही त्याच ठिकाणी पडले होते. बचावलेले अनेकजण या गटारील आपल्या आप्‍तेष्टांना शोधत होते. दरम्यान, तालिबानच्या प्रवक्त्यानेही हा दहशतवादी हल्ला असल्याचे मान्य केले. मात्र मृतांची संख्या फक्‍त १५ इतकीच असल्याचा दावा त्याने केला.

स्पुतनिक या रशियन वृत्तसंस्थेने ही या स्फोटांत ८० जणांना प्राण गमवावे लागल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मृतांमध्ये अमेरिका, ब्रिटन आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांचा समावेश आहे. विमानतळाजवळील बैरन हॉटेलच्या शेजारी हा स्फोट झाला. या घटनेनंतर काबूल एअरपोर्टवरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सर्व विमानांभोवती नाटो सैनिकांनी सुरक्षाकडे केले.

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, हल्लेखोर गोळीबार करत विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ आला आणि स्वतःला बॉम्बने उडवून दिले. विमानतळाच्या एबी गेटवर ही घटना घडली. दुसरा आत्मघाती हल्ला विमानतळाच्या समोर असलेल्या हॉटेलमध्ये झाला. एबी गेटपासून जवळच हे हॉटेल आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांना या हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत अमेरिकेचे बारा मरीन कमांडो ठार झाल्याची माहिती आहे. एअरपोर्टवरही सतत गोळीबार सुरू असल्याचे समजते. या स्फोटांत अनेक अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र प्राथमिक वृत्तानुसार मृतांची संख्या ६० इतकी असल्याचे कळते. या स्फोटामुळे विमानतळाबाहेर जमलेल्या नागरिकांची पळापळ झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news