भारत-व्हिएतनाम संरक्षण करारामुळे चीनचा संताप

भारत-व्हिएतनाम संरक्षण करारामुळे चीनचा संताप

Published on

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

अमेरिका, फ्रान्स आणि रशियानंतर भारताने व्हिएतनामशी संरक्षणविषयक विशेष करार केला आहे. या करारानुसार दोन्ही देशांच्या युद्धनौका, विमाने आदी एकमेकांच्या युद्धतळाचा वापर करू शकणार आहेत.

भारताचा चीनसोबत सीमावाद आहे, तर व्हिएतनामचाही चीनसोबत सागरी सीमांबाबत वाद असून, दोन्ही देशांचे चीनशी युद्ध झाले आहे. त्यामुळे हा करार झाल्याने चीनचा चांगलाच जळफळाट झाला आहे. व्हिएतनामने प्रथमच कोणत्याही देशासोबत अशा स्वरूपाचा करार केला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि व्हिएतनामचे जनरल फान व्हॅन गिआंग यांनी या करारावर सह्या केल्या आहेत. भारत आणि व्हिएतनाममध्ये समकालीन काळातील सर्वात विश्वासार्ह संबंध आहेत ज्यामध्ये व्यापक हितसंबंध आणि समान चिंता असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news