ब्राँझ युगातील माणसाचा सांगाडा

ब्राँझ युगातील माणसाचा सांगाडा

लंडन : इंग्लंडमध्ये केम्ब्रिजशायरच्या बुरवेल येथील उत्खननात ब्राँझ युगातील माणसाचा सांगाडा सापडला. हा माणूस गावातील एक ज्येष्ठ व प्रतिष्ठित व्यक्ती असावा असे संशोधकांना वाटते. ब्राँझ युगाच्या अखेरच्या टप्प्यातील एका गावात हा माणूस राहत होता.

वयाची चाळीशी ओलांडलेल्या या माणसाचे शरीर एकेकाळी धष्टपुष्ट असावे असे दिसून येते. आर्कियोलॉजिस्ट लुईस मोन यांनी सांगितले की त्याला दफन करण्याची जागा व पद्धत पाहता हा गावातील खास माणूस होता असे दिसते. इसवी सनापूर्वीच्या 2500 ते 2000 या काळातील हा माणूस आहे.

एका गोलाकार अशा आधीच निश्चित केलेल्या जागेत या माणसाला दफन करण्यात आले होते. गावासाठी अनेक वर्षे काम केलेला हा एखादा प्रतिष्ठित आणि शक्तिशाली माणूस होता असे दिसून येते. याठिकाणी सुमारे तीनशे वर्षे मानवी वसाहत होती. गुळगुळीत दगडापासून बनवलेले एक ब्रेसलेटही याठिकाणी सापडले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news