कोलंबियात भूस्खलनाने 34 मृत; मृतांत 8 मुलांचा समावेश

कोलंबियात भूस्खलनाने 34 मृत; मृतांत 8 मुलांचा समावेश

कोलंबिया : दक्षिण अमेरिकेतील कोलंबियातील रिसारल्डा प्रांतात भूस्खलनाने एक बस ढिगार्‍याखाली दबली. या अपघातात 34 जण मरण पावले. मृतांमध्ये 8 मुलांचा समावेश आहे.

बससोबतच इतर अन्य वाहनेही ढिगार्‍याखाली दबली. बस कॅली शहरातून चोको प्रांतातील कोंडोटो शहराकडे जात होती. पुएब्लो रिको आणि सांता सेसिलिया दरम्यान ही दुर्घटना घडली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news