झोमॅटोच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा

Zomato Akriti Chopra Resigns
Zomato Akriti Chopra Resigns
झोमॅटोच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑनलाइन फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato च्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांनी राजीनामा दिला आहे. सध्या Zomato मध्ये चीफ पीपल ऑफिसर (CPO) म्हणून त्या कार्यरत होत्या. आकृती यांनी २०११ पासून कंपनीच्या जडणघडणीसाठी महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. २०२१ मध्ये पदोन्नती नंतर त्या सह-संस्थापक बनल्या होत्या.

कोण आहे आकृती चोप्रा?

Zomato च्या वरिष्ठ व्यवस्थापनात असलेल्या आकृती चोप्रा सह-संस्थापकांपैकी एक होत्या. झोमॅटोपूर्वी आकृती या पीडब्ल्यूसीमध्ये आर्टिकल असिस्टंट होत्या. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमनमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. २०२१ मध्ये Zomato च्या सह-संस्थापक म्हणून त्यांना बढती मिळाली. त्यापूर्वी आकृती या उपाध्यक्ष, वित्त म्हणून कार्यरत होत्या.

आकृती चोप्रा BlinkIt CEO अलबिंदर धिंडसा यांच्या पत्नी

दीपंदर गोयल हे Zomato चे सह-संस्थापक आणि CEO आहेत. आकृती चोप्रा ही BlinkIt CEO अलबिंदर धिंडसा यांची पत्नी आहे. सुमारे दोन वर्षांत कंपनीतून बाहेर पडणाऱ्या आकृती चोप्रा या पाचव्या सह-संस्थापक आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news