

Zohran Mamdani Recall Pandit Jawaharlal Nehru:
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळा सुरू झाल्यानंतर झालेल्या पहिल्या मोठ्या निवडणुकीत विरोधी पक्ष डेमॉक्रेटिक पक्षानं जोरदार कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे सर्व जगाचे लक्ष असलेली आणि खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिष्ठेची केलेली न्यूयॉर्क महापौर पदाची निवडणूक जिंकत डेमॉक्रेटिक पक्षानं रिपब्लिकन पक्षाला मात दिली.
डेमॉक्रेटिक पक्षाचे जोहरान ममदानी यांनी अँड्र्यू क्यूमो यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. ते न्यूयॉर्क सिटीचे पहिले भारतीय अमेरिकन महापौर ठरले आहेत. त्याचबरोबर ते या शहराचे पहिले मुस्लिम महापौर देखील झाले आहेत. भारतीय वंशाचे असलेल्या ममदानी यांनी आपल्या विजयी भाषणात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा यांचा उल्लेख केला. आज आपण जुन्यातून नव्याकडे पाऊल टाकत आहोत असे ते म्हणाले.
जोहरान ममदानी आपल्या भाषणात म्हणाले, 'मी आज जवाहरलाल नेहरूंच्या शब्दांबाबत विचार करत आहे. इतिहासात असे फार कमी क्षण येतात तिथे आपण जुन्यातून नव्याकडे प्रवास करतो. ज्यावेळी एका युगाचा अंत होतो आणि देशाच्या आत्म्याला अभिव्यक्ती मिळते. आज रात्री आपण नव्या युगाकडे मार्गक्रमण करत आहोत.'
सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार अनेक अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर डेमॉक्टेटिक्स पक्षाला हा विजय मिळाला आहे. हे त्यांचं राजकीय दृष्ट्या मोठं यश मानलं जात आहे. ममदानी यांनी आपल्या भाषणात न्यूयॉर्क हे अप्रवासींचे शहर कायम राहील असं सांगितलं. हे शहर अप्रवासी लोकांनी बनवलं आहे. अप्रवासी लोकं याचं संचालन करतात आणि आज रात्रीपासून अप्रवासी या शहराचं नेतृत्व देखील करणार आहेत असं सांगितलं.
विजयी भाषणात जोहरान ममदानी यांनी, 'आज आपण एका राजनैतिक वंशाला उखडून टाकलं आहे. न्यूयॉर्क आता एक असं शहर म्हणून पुढे येईल की जे शहर अप्रवासींनी तयार केलं आहे, चालवलं जात आहे आणि आता त्यांचं नेतृत्व देखील केलं त्यांच्याकडूनच केलं जाईल.'
ममदानींनी आपल्या समर्थकांना सांगितलं की भविष्य आता आपल्या हातात आहे. हे शहर टॅक्सी चालक, नर्स, मेड आणि दुकानदार यांचं आहे. ही लोकशाही देखील त्यांचीच आहे.
ममदानी यांनी आपल्या अभियानादरम्यान एक टॅक्सी चालक रिचर्डसोबत केलेल्या १५ दिवसांच्या उपोषणाच्या आठवणींना देखील उजाळा दिला. त्यांनी हा विजय कष्टकऱ्यांच्या आवाजाला सशक्त करणारा आहे असं देखील सांगितलं.