ब्राझीलमध्ये 'X' बंद केले? एलॉन मस्क यांनी सांगितले कारण...

ब्राझिलियन जनता पूर्वीप्रमाणेच एक्स वापरेल?
Elon Musk
ब्राझीलमध्ये एक्स बंद केले? एलॉन मस्क यांनी सांगितले कारण...Elon Musk X
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) नेहमी चर्चेत असतात. सोशल मीडियावर सक्रिय असतात. एक्सवर अनेक प्रयोग करत असतात.  मस्क यांनी आता एक नवीन घोषणा केली आहे. इलॉन मस्क यांनी ब्राझीलमधील एक्सचे ऑपरेशन त्वरित बंद करण्याची घोषणा केली आहे.

ब्राझिलियन जनता पूर्वीप्रमाणेच एक्स वापरेल?

एलॉन मस्क (Elon Musk) यांनी शनिवारी (दि.१७) एक मोठी घोषणा करत माहिती दिली आहे की,  ब्राझीलमधील एक्सचे ऑपरेशन त्वरित बंद करावे. या निर्णयासाठी ब्राझीलचे सर्वोच्च न्यायाधीश अलेक्झांडर डी मोरेस यांना जबाबदार धरले आहे. एक्सने म्हटले आहे की, कायद्याचे पालन करण्याऐवजी मोरेस यांनी ब्राझीलमधील आपल्या कर्मचाऱ्यांना धमकावले.

इलॉन मस्क यांची आता ब्राझीलच्या न्यायाधीश यांच्यातील वाद गेल्या वर्षभरापासून सुरू असला तरी तो आता टोकाला पोहोचला आहे. इलॉन मस्क यांनी ब्राझीलमधील एक्सचे ऑपरेशन त्वरित बंद करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ एस्कचे कर्मचारी यापुढे ब्राझीलमध्ये राहणार नाहीत. तथापि, ब्राझिलियन जनता पूर्वीप्रमाणेच एलोन मस्कचा एक्स वापरणे सुरू ठेवेल.

एक्स आता  ब्राझीलमधील कार्यालये बंद करेल परंतु दूरस्थपणे सेवा ऑपरेट करेल. आम्हाला हे करण्यास भाग पाडले गेल्याचे आम्हाला खूप दु:ख आहे, असेही एक्सने म्हटले आहे. एक्सचे सीईओ एलोन मस्क यांनीही या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि अलेक्झांड्रे डी मोरेसच्या निर्णयाला न्यायाचा घोर गर्भपात म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news