World's Loneliest House |ना शेजारी, ना वीज - पाणी ; अथांग समुद्राच्या मध्यभागी असलेल्या जगातील सर्वात एकाकी घराचे रहस्य काय?

जगात झोंबी आले तर त्‍यांच्यापासून वाचण्यासाठी घर बांधले असल्याच्या सोशल मिडीयावर अनेक अफवा
World's Loneliest House |ना शेजारी, ना वीज - पाणी ; अथांग समुद्राच्या मध्यभागी असलेल्या जगातील सर्वात एकाकी घराचे रहस्य काय?
Published on
Updated on

आईसलॅन्ड देशात एका बेटावर असे घर आहे. की तेथे राहण्याचे धाडस कोणीच करणार नाही. कारण हे घर आहे जगातील सर्वात एकाकी घर. याच्या आसापासच नाही तर संपूर्ण बेटावरही कोणतेही घर नाही किंवा कसलीच वस्ती नाही. आईसलॅन्डमधील एलइडे (Elliðaey) बेटावर असलेल्या या घराला 'वर्ल्ड्स लोन्लिएस्ट हाऊस' (World's Loneliest House) म्हणून ओळखले जाते. या घराबाबत सोशल मिडीयावर अनेक अफवा उडत असतात. कोणी म्हणते झोंबी पासून वाचण्यासाठी हे घर बांधले आहे. तर एका गायीकेला हे घर भेट दिले आहे तर खरे काय आहे हे जाणून घेवूया.

एवढ्या निर्जन ठिकाणी हे घर बांधले कोणी

हे घर शिकाऱ्यांसाठी बाधण्यात आले होते. १९५३ मध्ये 'एलइडे हंटिंग असोसिएशन' या संस्थेने याचे बांधकाम केले. कारण या बेटावर मोठ्या प्रमाणात 'पफिन' (Puffin) नावाचे पक्षी आढळतात. त्यांच्या शिकारीसाठी या असोसिएशनच्या सदस्य येत असत. त्‍यांना राहण्यासाठी आणि विश्रांतीसाठी हे घर बांधण्यात आले आहे. ही खाजगी मालमत्ता असून केवळ या असोसिएशनच्या सदस्यांनाच तिथे राहण्याची परवानगी आहे.

घरात नाहीत कोणत्‍याच सुविधा

हे घर अतिशय दुर्गम भागात असल्याने तिथे वीज, नळ किंवा पाण्याची पाईपलाईन नाही. मात्र, पावसाचे पाणी साठवून ठेवण्याची व त्‍याचा वापर करण्याची सुविधा आहे. हे घर एका विस्तीर्ण हिरव्यागार टेकडीवर वसलेले असून त्याच्या चोहोबाजूंनी अथांग समुद्र आहे. अगदी फिल्मचा सेट वाटावा अशा सुंदर लोकेशनवर हे बांधण्यात आले आहे. हे बेट आईसलॅन्डच्या दक्षिण किनारपट्टीवर असलेल्या 'वेस्टमन आयलँड्स' या द्वीपसमूहाचा भाग आहे. येथून सर्वात जवळचे मानवी वस्ती असलेले ठिकाण 'हेयमे' हे बेट आहे.

घराविषयी सोशल मिडीयावर अनेक अफवा

पर्यटक हेयमे बेटावरून बोट घेऊन किंवा फेरीत बसून या घराचे दर्शन घेऊ शकतात. अफवा: हे घर एखाद्या अब्जाधीशाने 'झोम्बी अटॅक' पासून वाचण्यासाठी बांधले आहे किंवा आईसलॅन्डची प्रसिद्ध गायिका 'ब्योर्क' (Björk) हिला सरकारने हे बेट भेट दिले आहे, अशा अनेक अफवा इंटरनेटवर पसरवल्या. मात्र, त्या सर्व चुकीच्या आहेत.

सध्या हे बेट निर्जन झाले असून यापूर्वी १९३० पर्यंत येथे काही मासेमारी करणारी कोळी कुंटूंबे वास्तव्यास होती. पण कालांतराने ती मुख्य भुभागावर निघून गेल्याने हे बेट निर्जन झाले. नंतर १९५३ मध्ये या बेटावर एलइडे हंटिंग असोसिएशन संस्थेने याठिकाणी हे घर बांधले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news