फेसबूक बंद होणार? मार्क झुकेरबर्ग चिंतेत; मित्र बनविण्याचा काळ मागे पडल्याचा दावा...

Mark Zuckerberg: फेसबूकचे महत्व, सांस्कृतिक प्रभाव घटल्याचा ई-मेलमध्ये उल्लेख
Mark Zuckerberg
Mark Zuckerbergx
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: फेसबुकच्या सांस्कृतिक प्रभावात होणारी घट आणि त्याच्या भविष्यातील संधीबद्दल मेटाचे CEO मार्क झुकेरबर्ग यांनी चिंता व्यक्त केली आहे.

2022 च्या एप्रिलमध्ये झुकेरबर्ग आणि फेसबुकचे प्रमुख टॉम अ‍ॅलिसन यांच्यात ईमेल्सद्वारे झालेल्या संवादामध्ये, फेसबुकचे स्थान आणि युजरच्या वर्तनात होणाऱ्या बदलांबद्दल गंभीर चर्चा झाली आहे. (Meta CEO Mark Zuckerberg on Facebook)

हे ईमेल्स सध्या अमेरिकेतील फेडरल ट्रेड कमिशनच्या अँटी ट्रस्ट कारवाईच्या संदर्भात कोर्टात सादर करण्यात आले आहेत. यामध्ये झुकेरबर्ग यांनी फेसबुकचे युजर्स अजूनही सक्रियता असले तरी पूर्वीचा सांस्कृतिक प्रभाव दिसत नाही, त्यामुळे फेसबुकच्या भविष्याबद्दल प्रश्न उभे राहिल्याचे म्हटले आहे.

फ्रेंडिंग मॉडेलचा काळ गेला?

झुकेरबर्ग यांच्या मते, फेसबुकवर असलेल्या मित्र यादीचे "फ्रेंडिंग" मॉडेल आता जुने झाले आहे. आजकाल अनेक युजर्सचे फ्रेंड्स नेटवर्क हे त्यांच्या ताज्या आणि वैयक्तिक आवडींशी संबंधित नाही.

अनेक युजर्सची फ्रेंड लिस्ट अधिकतर अशा मित्रांनी भरलेली आहे की ज्यांना ते खरोखर ऐकू इच्छित नाहीत किंवा ज्यांच्याशी ते सुसंगत राहू इच्छित नाहीत.

फ्रेंडलिस्ट नव्याने बनविण्याची संधी देणार

झुकेरबर्ग यांना हे देखील जाणवले की, पारंपारिक "फ्रेंडिंग" मॉडेल जरी फेसबुकवर सक्रियता आणत असले तरी, त्याच्या सध्याच्या पद्धतीला काहीतरी नवीन आणि आधुनिक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे.

यासाठी, त्यांनी टॉम अ‍ॅलिसन यांच्यासमोर एक "क्रेझी आयडिया" मांडली आहे — ते म्हणजे युजरच्या फ्रेंड लिस्टचे पूर्णपणे पुनरावलोकन करणे आणि युजर्सना त्यांच्या कनेक्शन्ससाठी नवीन प्रारंभ करण्याची संधी देणे.

झुकेरबर्ग यांनी हे सुद्धा सांगितले की, इन्स्टाग्राम किंवा ट्विटर सारख्या प्लॅटफॉर्मवरील "फॉलोईंग" पद्धत अधिक लोकप्रिय होऊ लागली आहे. त्यामुळे फेसबुकची "फ्रेंडिंग" संकल्पना मागे पडत आहे.

रील्स बाबत शंका

फेसबुकने "रील्स" हे शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ फिचर लाँच केले. टिकटॉकला प्रत्युत्तर म्हणून ते डिझाईन केले. यामुळे, फेसबुकची तरुण वयोगटातील लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न केला गेला, पण झुकेरबर्ग यांच्या ईमेल्समध्ये हे दिसून येते की, त्यांना रील्सबाबतही शंका आहेत.

"रील्स"सारखे फिचर्स फेसबुकच्या सांस्कृतिक गती, प्रभाव पूर्ववत करू शकते का याबद्दल अजूनही शंका आहे.

फेसबुकच्या "ग्रुप्स" फिचरवर झुकेरबर्ग म्हणतात की, ग्रुप्समध्ये खूप गुंतवणूक केली आहे, पण त्याचा प्रभाव दीर्घकालिन कितपत राहिल हे शंकास्पद आहे. ग्रुप्समध्ये संदेशवहन आणि समुदायांच्या संवादाबाबत आशा असली तरी त्याचा विस्तार होण्याबाबत शंका आहे.

 फेसबूकने काळानुसार सुधारणे गरजेचे

झुकेरबर्ग यांच्या या चिंतेचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे फेसबुकचे बदलते स्थान आणि युजर्सचे वर्तन. फेसबुक अजूनही मोठ्या प्रमाणावर वापरले जाते, पण त्याचा सांस्कृतिक प्रभाव कमी होत चालला आहे. झुकेरबर्ग यांचा मुख्य दृष्टिकोन असाच आहे की, फेसबुकला बदलत्या काळानुसार स्वतःला सुधारणे आणि आधुनिकता स्वीकारणे आवश्यक आहे.

मार्क झुकेरबर्ग हे फेसबुकला एका नवीन आणि आधुनिक दिशेने नेण्याच्या प्रयत्नात आहेत. यामध्ये "फ्रेंडिंग" मॉडेलला मागे टाकून "फॉलोईंग" साठी अधिक जागा दिली जाऊ शकते.

Mark Zuckerberg
ChatGPT ला विचारलेल्या एक सहज प्रश्नाने वाचवला गर्भवती आणि बाळाचा जीव...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news