Sushila Karki Nepal PM :
नेपाळमधील हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान ओली यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, नेपाळमधील आंदोलन पेटवणारे Gen Z यांनी देशाचं नेतृत्व कोणाकडे असावं यासाठी दोन नावं सुचवली होती. त्यातील एक नाव हे काठमांडूचे अपक्ष महापौर बालेंद्र शहा यांचं आहे. तर दुसरं नाव हे नेपाळच्या पहिल्या महिला चीफ जस्टिस सुशिला कार्की यांचं आहे. सध्या सुशिला कर्की यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळं त्यांच्याविषयी कुतूहल निर्माण झालं आहे. त्यांचं भारताशी देखील कनेक्शन आहे. तर जाणून घेऊयात कोण आहेत सुशिला कार्की....
- सुशिला कार्की या नेपाळच्या पहिल्या महिला चीफ जस्टिस आहेत. त्यांनी जुलै २०१६ पासून जून २०१७ पर्यंत देशाचं मुख्य न्याधीशाचं पद सांभाळलं होतं. त्यावेळी त्यांनी भ्रष्टाचाराविरूद्ध झिरो टॉलरंन्स पॉलिसी राबवली होती.
- सुशिला कार्की यांचा जन्म हा ७ जून १९५२ रोजी बिरातनगर इथं झाला. त्या त्यांच्या सात भावंडांमधील सर्वात मोठ्या आहेत. त्यांनी १९७९ मध्ये आपलं कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्या २००७ मध्ये वरिष्ठ अधिवक्ता झाल्या.
- सुशिला कार्की यांनी महेंद्र मोरांग कॅम्पसमधून आपली बीएची डिग्री घेतली होती. त्यानंतर त्यांनी भारतातील बनारस हिंदू विद्यापीठातून १९७५ मध्ये पॉलिटिकल सायन्समधून एमएची डिग्री घेतली. त्यांनी कायद्याची डिग्री त्रिभूवन विद्यापीठातून घेतली आहे.
- कार्की या सर्वात प्रथम २००९ मध्ये अॅड हॉक जज म्हणून सर्वोच्च न्यायालयात पोहचल्या. त्यानंतर २०१० मध्ये त्या कायस्वरूपी जज म्हणून काम करू लागल्या.
- 2017 मध्ये नेपाळी काँग्रेस आणि सीपीएन यांनी कार्की यांच्याविरूद्ध संसदेत महाभियोग चालवला होता. त्यावेळी त्यांना काही काळासाठी आपलं चीफ जस्टीस पद सोडवं लागलं होतं. त्यांच्यावर पक्षपातीपणे निर्णय दिल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
सुशिला कार्की यांना भारताच्या पंतप्रधानांबाबत देखील वक्तव्य केलं होतं. त्यांनी न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत 'मी मोदीजींबद्दल माझं मत चांगलं आहे. सांगितलं होतं. त्याचबरोबर त्या पुढे म्हणाल्या की, 'आम्ही काही काळापासून भारताच्या टचमध्ये नाहीये. आम्ही याबाबत बोलू. ज्यावेळी दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय संबंधांचा विषय येतो त्यावेळी काही लोकं एकत्र बसून धोरण ठरवतील.'