Russia Poland Conflict : तिसऱ्या महायुद्धाचे ढग दाटले; रशिया-पोलंड फ्रंट ओपन होणार?

रशिया युक्रेन संघर्ष कमी होण्याची चिन्हे दिसत नसताना आता रशिया आणि पोलंड ही फ्रंड देखील ओपन होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
Russia Poland Conflict
Russia Poland Conflict Canva Image
Published on
Updated on

Russia Poland Conflict :

रशियाचे ड्रोन पोलंडनं पाडल्यानंतर युरोपात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रशिया युक्रेन संघर्ष कमी होण्याची चिन्हे दिसत नसताना आता रशिया आणि पोलंड ही फ्रंड देखील ओपन होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रशियानं पोलीश एअरस्पेस ओलांडल्यानंतर नाटोचे प्रमुख मार्क रूट्टे यांनी मॉस्कोवर टीका केली. त्यांनी रशियाचं हे वागणं धोकादायक असल्याच सांगितलं. त्यांनी पोलंडनं रशियाला चोख प्रत्युतर दिल्याचं देखील ते म्हणाले.

दरम्यान, रशियाच्या अधिकाऱ्यांनी पोलंडचा ड्रोन पाडल्याचा दावा तथ्यहीन असल्याचं सांगितलं. जो ड्रोन पाडला तो रशियाचाच होता याबाबत कोणतेही पुरावे त्यांनी दिलेली नाही. दरम्यान, पोलीश पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी नाटोकडे आर्टिकल ४ वर सल्लामसलत करण्याची मागणी केली आहे. रशिया मोठ्या प्रमाणावर युद्धासाठी उकसवत असल्याचा दावा त्यांनी केला.

Russia Poland Conflict
India US Trade Talks | भारत-अमेरिका कोंडी फुटणार? वाटाघाटी सुरू

ते पुढे म्हणाले, 'पुतीन यांच्यासाठी माझा स्पष्ट संदेश आहे. युक्रेनविरूद्धचं युद्ध थांबवा, युद्धाची व्याप्ती वाढवण्याचं बंद करा, ते आता निष्पाप नागरिकांना आणि त्यांच्या संपत्तीला टार्गेट करत आहेत.'

दरम्यान, नाटो प्रमुख म्हणाले, 'आमच्या मित्र देशांची हवाई हद्द ओलांडणं बंद करा. आम्ही आता सज्ज आहोत. आम्ही सतर्क आहोत. आम्ही नाटोची एक एक इंच जमीन लढवू.'

पोलंडनं १९ रशिनय ड्रोन्स पाडल्याचा दावा केलाय. रशियानं युक्रेनवर मोठा हल्ला करत असताना ही कारवाई केल्याचा दावा पोलंडनं केला आहे. ही नाटो देशानं पहिल्यांदाच रशिया युक्रेन युद्धात केलेली सैन्य कारवाई आहे.

Russia Poland Conflict
Poland shoots Russian drone | पोलंडने पाडले रशियन ड्रोन

काय आहे आर्टिकल ४ आणि ५?

नाटो आर्टिकल ४ नुसार नॉर्थ आटलांटिक ट्रिटी ऑर्गनाईजेशनचे सदस्यांपैकी कोणत्याही कोणाही बाबतीत सीमा, राजकीय स्वातंत्र्य किंवा सुरक्षेबाबत कोणतीही समस्या उद्भवली, कोणताही धोका उद्भवला तर सर्व सदस्य त्याबाबत सल्लामसलत करतात आणि आपलं मत व्यक्त करतात. या काऊन्सीलला एकत्रित कोणताही निर्णय किंवा कारवाई करण्याचा अधिकार असतो.

नाटोची निर्मिती ही १९४९ साली झाली होती. तेव्हापासून आर्टिकल ४ हे सातवेळा वापरण्यात आलं होतं. नुकतेच २०२२ मध्ये बल्गेरिया, चेक रिपब्लिक, इस्टोनिया, लाथविहाय, लुथआनिया, पोलंड, रोमानिया आणि स्लोव्हाकिया यांनी रशियानं युक्रेनवर हल्ला केला त्यावेळी या आर्टिकलनुसार चर्चा केली होती.

नाटो अम्बॅसिडोर यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये आपत्कालीन बैठक बोलावली होती. त्यावेळी पोलंडमधील मिसाईल हल्ल्यात दोन लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी युद्धाची झळ ही शेजारी देशात देखील पसरेल अशी भीती निर्माण झाली होती.

जर रशियानं सातत्यानं नाटो देशातील सदस्यांच्या सीमेत हल्ले करणे सुरू ठवले तर आर्टिकल ५ अंमलात आणलं जाऊ शकतं. हे मुख्य नाटो स्थापनेतील मुख्य आर्टिकल आहे. याला रशिया - अमेरिका कोल्ड वॉरची पार्श्वभूमी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news