

वॉशिंग्टन डी सी: अनिल टाकळकर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या पूर्व विंगचा ( ) संपूर्ण भाग पाडण्यास मंजुरी दिली असून, त्या जागेवर 90,000 चौ.फुटांची आलिशान बॉलरूम उभारण्यात येणार आहे. व्हाईट हाऊसच्या इतिहासातील सर्वात मोठे हे बांधकाम असून अमेरिकेच्या सर्वाधिक महत्वाच्या ऐतिहासिक वास्तुची ही मोडतोड असल्याचे मानले जात आहे.
बुधवारी ही पाडापाड सुरु झाली . यावेळी ट्रम्प यांनी सांगितले, “पूर्व विंग फार मोठी बाब नाही . ती एक छोटी इमारत होती. सरकारी मेजवानी आणि इतर समारंभ भव्य स्वरूपात आयोजित करण्यासाठी बॉलरूम आवश्यक आहे.”
दोन वरिष्ठ प्रशासनिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूर्व विंगचा पाडण्याचे काम या आठवड्याच्या अखेरपर्यत पूर्ण होईल. या प्रकल्पाचा खर्च आता 300 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 2500 कोटी रुपये) इतका होणार आहे आरंभीच्या अंदाजापेक्षा शंभर दशलक्ष डॉलर्सने तो अधिक आहे.
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार नवे बांधकाम व्यवस्थित रीतीने करायचे असल्याने जुना भाग पाडावाच लागला. काही भाग मात्र आहे तसें कायम ठेवले आहेत. परंतु अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रत्यक्षात संपूर्ण पूर्व विंग जमीनदोस्त होत आहे.
या प्रकल्पाचा परिणाम व्हाईट हाऊसच्या पश्चिम विंगवर किंवा राष्ट्राध्यक्षांच्या निवासभागावर होणार नाही. तथापि, पूर्वी ट्रम्प यांनी जुलै महिन्यात दिलेल्या आश्वासनात म्हटले होते की, “ही बॉलरूम इमारतीला न लागता बाजूला बांधली जाईल आणि विद्यमान रचनेचा पूर्ण आदर राखून ती अबाधित ठेवली जाईल.
तथापि, तांत्रिक तपासणीनंतर प्रशासनाने असे ठरविले की, पूर्व विंग संपूर्ण पाडून नव्याने बांधकाम करणे अधिक स्वस्त आणि सुरक्षित ठरेल. बुधवारी सिक्रेट सर्व्हिसने परिसर सील करून भारी यंत्रसामग्रीने इमारतीचे भाग तोडण्यास सुरुवात केली.
प्रकल्पावरील टीका आणि कायदेशीर वाद
जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातील कायदाशास्त्र प्राध्यापिका सारा सी. ब्रोनिन यांनी म्हटले की, व्हाईट हाऊसची पाडापाडीच्या भावनेच्या विरुद्ध आहे. हा कायदा ऐतिहासिक स्थळांच्या जतनासाठीच आणला गेला होता.
इतिहासाचा भाग होणार नाहीसा
1902 मध्ये अध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांच्या काळात पूर्व विंगची निर्मिती झाली होती. 1940 च्या दशकात अध्यक्ष फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांच्या आदेशाने त्याची पुनर्बांधणी करण्यात आली या विंगमध्ये प्रथम महिला म्हणजे अध्यक्षांच्या पत्नीच्या कार्यालयासह व्हाईट हाऊस स्टाफचे काही विभाग कार्यरत होते. येथेच राष्ट्राध्यक्षांच्या आपत्कालीन सुरक्षेसाठी भूमिगत बंकर तयार करण्यात आला होता.
या इमारतीतूनच अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी त्यांच्या राजकीय सल्लागार डिक मॉरिस यांची गुप्त भेट याच ठिकाणी घेतली होती. 11 सप्टेंबर 2001 च्या दहशतवादी हल्ल्यांनंतर उपाध्यक्ष डिक चेनी यांना याच बंकरमध्ये नेण्यात आले होते. 2020 मध्ये झालेल्या निदर्शनांदरम्यान ट्रम्प यांनाही तात्पुरत्या सुरक्षेसाठी तिथे हलविण्यात आले होते.