होळी दिवशी 'चंद्र' रंगला लाल रंगात! जाणून घ्या संपूर्ण 'ब्लड मून'विषयी...

Lunar eclipse 2025 | चंद्रग्रहणाची भारतातील दृश्यमानता कशी होती
Lunar eclipse 2025
संपूर्ण 'ब्लड मून' कधी आणि कुठे दिसले...? जाणून घ्या याविषयीFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : या वर्षीतील एक महत्त्वाची खगोलीय नुकतिच घडल्याचे समोरआले आहे. या वर्षीचे पहिले पूर्ण चंद्रग्रहण शुक्रवारी (दि.१४) पहाटे दिसल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. 'चंद्रग्रहण' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खगोलीय घटनेत चंद्र लाल रंगात दिसला, त्यामुळेच चंद्राला 'ब्लड मून' असे म्हटलं गेलं आहे.

जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्यभागी येते तेव्हाच पूर्ण चंद्रग्रहण होते. पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने लालसर आणि मंद दिसतो. चंद्रग्रहणादरम्यान, चंद्र दृष्टीआड होत नाही तर फक्त चंद्राचा रंग लालसर होतो. याचे कारण असे की पृथ्वीच्या वातावरणातून जाणारा सूर्यप्रकाश कोनात पसरतो आणि फिल्टर होतो, ज्यामुळे लाल प्रकाशाच्या जास्त तरंगलांबी वातावरणात प्रवेश करतात आणि चंद्रापर्यंत पोहोचतात. ही खगोलीय घटना कशी सुरू झाली याचा व्हिडिओ अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्था नासाने त्यांच्या एक्स सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.

अन्‌ 'ब्लड मून' तयार झाला

शुक्रवारी सूर्योदयापूर्वी ब्रिटनमधील खगोलप्रेमींनी चंद्रग्रहण दिसले. यावेळी पृथ्वीच्या सावलीने चंद्राचा काही भाग व्यापला होता. पण ब्रिटनच्या काही पश्चिम भागात तसेच अमेरिका आणि काही पॅसिफिक बेटांवर पूर्ण चंद्रग्रहण दिसणार आहे. २०२२ नंतरचे हे पहिले चंद्रग्रहण आहे. चंद्र पृथ्वीच्या सावलीत येताच एक आश्चर्यकारक 'ब्लड मून' तयार झाला. जो नंतर हळूहळू गडद होत गेला. त्यानंतर तो गडद लाल रंगात रंगला.

चंद्रग्रहण कधी आणि कुठे दिसले?

हे चंद्रग्रहण आज शुक्रवार १४ मार्च २०२५ पहाटेपासून दिसण्यास सुरूवात झाली असून ते दुपारपर्यंत दिसले. अमेरिका, पश्चिम युरोप आणि अटलांटिक महासागरातील आकाशगंगेतील पर्यटकांना ही घटना पाहता आली. तसेच भारतातील लोक होळीच्या सणानिमित्त आणि पौर्णिमेमुळे चंद्रग्रहण पाहू शकले नाहीत. मात्र ७-८ सप्टेंबर २०२५ रोजी होणारे वर्षातील दुसरे चंद्रग्रहण भारतातील लोकांना दिसण्याची शक्यता आहे.

असे पाहावे सुरक्षितपणे चंद्रग्रहण....

आज पृथ्वीच्या काही भागात लोकांना दिसणारे पूर्ण चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे पूर्णपणे सुरक्षित आहे. सूर्यग्रहणांना डोळ्यांना नुकसान होऊ नये म्हणून विशेष चष्म्याची आवश्यकता असते, तर चंद्रग्रहणांमुळे प्रेक्षकांच्या दृष्टीला कोणताही धोका निर्माण होत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news