युद्ध झाल्यास इस्रायलला उद्ध्वस्त करू : हसन नसरल्लाह

युद्ध झाल्यास इस्रायलला उद्ध्वस्त करू : हसन नसरल्लाह

तेहरान, वृत्तसंस्था : युद्ध झाल्यास इस्रायलची एक जागा सुरक्षित ठेवणार नसून, त्या देशाला पूर्णपणे उद्ध्वस्त करू, अशी धमकी दहशतवादी संघटना 'हिजबुल्लाह'चा म्होरक्या हसन नसरल्लाह याने दिली आहे. इतकेच नाही, तर त्याने सायप्रसवरही हल्ला करण्याचा इशारा दिला आहे.

नसरल्लाह म्हणाला की, इस्रायलने आमच्यावर हल्ला केल्यास जमीन, हवा आणि पाण्यासह अन्य मार्गाने त्यांच्यावर हल्ला करू. यामुळे भूमध्य महासागरही धोक्यात पडू शकतो. हिजबुल्लाह कोणताही नियम आणि सीमा तोडण्यास तयार आहे. आमच्या रॉकेट हल्ल्यापासून कोणीच वाचू शकत नाही, हे आमच्या शत्रूंना चांगलेच माहीत आहे. सायप्रसला युद्धाची धमकी देत नसरल्लाह म्हणाला की, युद्धदरम्यान इस्रायलला सायप्रसने आपली विमानतळे आणि लष्करी तळ वापरण्यास परवानगी दिली आहे.

जर सायप्रसने लेबनानवर हल्ला करण्यासाठी इस्रायलला मदत केली, तर हिजबुल्लाह त्याला युद्धाचा एक भाग मानेल. त्यानंतर सायप्रसला हिजबुल्लाहचे हल्ले सहन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. दुसरीकडे इस्रायल संरक्षण फोर्सचे (आयडीएफ) प्रवक्ते डमिरल डॅनिअल हगारी यांनी सांगितले आहे की, युद्ध हे केवळ हमासला नष्ट करण्यासाठी नाही आहे. हमासचा खात्मा करण्याचा विचार हा इस्रायल नागरिकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासारखे आहे. हमास ही एक विचारधारा आहे, जी पॅलेस्टाईन नागरिकांच्या मनात बसली आहे. हमासचा खात्मा करावा, असे ज्यांना वाटते ते चुकीचे आहे. इस्रायल सरकारने युद्धावर काही पर्याय काढला नाही, तर हमास आमच्यामध्ये राहील.

सायप्रस युद्धाचा भाग नाही

आमचा देश कोणत्याही युद्धाचा भाग नाही. सायप्रस हमास-इस्रायल युद्धावर तोडगा काढण्याच्या बाजूने आहे. शांततेच्या मार्गानेच युद्धबंदी केली जाऊ शकते, असे मत नसरल्लाह याच्या धमकीनंतर सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news