पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कोरोनाची लागण झाली आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन पियरे यांनी ही माहिती दिली. लास वेगासमधील युनिडोस कॉन्फरन्समधील भाषणापूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या अहवालात बायडेन यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन पियरे यांनी सांगितले की, अध्यक्ष जो बायडेन यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. ते आता डेलावेअरला परत येतील आणि स्वत:ला अलग ठेवतील. बायडेन यांचे डॉक्टर केविन ओ'कॉनर यांनी सांगितले की, बायडेन यांना सर्दी आणि खोकला यासारखी सौम्य लक्षणे दिसत आहेत. त्यांना थकवाही जाणवत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टनंतर त्यांना अँटी व्हायरल औषध पॅक्सलोविड देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.