

US Preparing Air Strike:
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच ख्रिश्चन लोकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना संपवण्यासाठी त्यांच्या डोक्यात अनेक योजना आहेत असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याबरोबरच अमेरिका हा लवकरच एका देशावर एअर स्ट्राईक करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तशी तयारी अमेरिका करत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नायजेरियात ख्रिश्चन धर्माच्या अस्तित्वाला धोका असल्याचं वक्तव्य केलं होतं. या देशात ख्रिश्चन लोकांवर कट्टर इस्लामवादी संघटना हल्ले करत आहेत. ट्रम्प यांनी या सर्वाचा बिमोड करण्यासाठी अमेरिका लवकरच नायजेरियावर हवाई हल्ला करू शकते. किंवा अमेरिका आपलं लष्कर देखील तिथं पाठवू शकते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नुकतेच फ्लोरिडीमध्ये आठवड्याची सुट्टी संपवून रविवारी सायंकाळी वॉशिंग्टनमध्ये परतले. त्यांनी परतत असताना एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मी आपल्या युद्ध विभागाला संभाव्य लष्करी कारवाई करण्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, ट्रम्प यांना ते नायजेरिच्या धरतीवर जाऊन कारवाई करणार का असं विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी असं असू होऊ शकतं. म्हणजे अनेक गोष्टी होऊ शकतात. मी अनेक गोष्टींचा विचार करत आहे. नायजेरियामध्ये मोठ्या संख्येनं ख्रिश्चन लोकं मारली जात आहेत. आम्ही तसं होऊ देणार नाही.'
यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी नायजेरियाला देण्यात येणारी मदत थांबवण्याची धमकी दिली होती. जर अफ्रिकेतील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश जर आपल्या देशातील ख्रिश्चन लोकांचे रक्षण करता येत नसेल तर अमेरिका लष्करी कारवाई करू शकतो. ट्रम्प यांनी या हिंसाचाराला कट्टर इस्लामिक घटकांना जबाबदार ठरवलं आहे. ट्रम्प यांनी नायजेरियाला अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या विशेष चिंताग्रस्त देशांच्या यादीत टाकल्याची घोषणा केली आहे.
नायजेरियाने रविवार सांगितले की, इस्लामिक दहशतवाद्यांशी लढण्यासाठी अमेरिकेने (US) केलेली मदत त्याला मान्य असेल, परंतु त्यासाठी त्याच्या प्रादेशिक अखंडतेचा (regional integrity) आदर केला जावा.
नायजेरियात ईसाइयांवरील हल्ल्यांचा इतिहास
नायजेरियामध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायांमधील संघर्ष 1950 च्या दशकापासून दिसून येतो.
बोको हराम (Boko Haram) आणि फुलानी (Fulani) मेंढपाळ यांसारखे गट 2009 नंतर कट्टरपंथी इस्लामिक तत्त्वांचे लक्ष्य बनले.
या गटांचे मुख्य लक्ष्य ग्रामीण ख्रिश्चन गावे आणि चर्च होते.
एका अहवालानुसार, 2009 पासून आतापर्यंत केवळ ख्रिश्चनविरोधी हिंसेत 45,000 पेक्षा अधिक लोकांचा बळी गेला आहे, तसेच हजारो चर्च नष्ट करण्यात आले आहेत.