Strait of Hormuz | होर्मुझमधील बेटावर अमेरिकेचा हल्ला; इराणचे जॉर्डन, बहरीनमध्ये हल्ले

Strait of Hormuz |
Strait of Hormuz | होर्मुझमधील बेटावर अमेरिकेचा हल्ला; इराणचे जॉर्डन, बहरीनमध्ये हल्ले
Published on
Updated on

वॉशिंग्टन/तेहरान/दुबई; वृत्तसंस्था : अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सलग ११ व्या रात्री इराणमधील लष्करी तळ, ड्रोन साठवण केंद्रे, नौदलाशी संबंधित ठिकाणे आणि लष्करी पायाभूत सुविधांवर हल्ले केल्याची माहिती दिली. इराणशी संबंधित वृत्तसंस्था तस्नीमने दावा केला आहे की अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीतील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या सामुद्रधुनीतील लाराक बेटावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्याची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

इराणची राजधानी तेहरानमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली असून देशाच्या विविध भागांत स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त आहे. दक्षिण इराणमधील बुशेहर, सिरिक आणि खुजेस्तान परिसरात अमेरिकेच्या हल्ल्यांची माहिती समोर आली आहे. दरम्यान, इराणने अमेरिकेला इशारा दिला आहे की, त्याच्या अणू केंद्रांवर हल्ला झाल्यास युद्धाचा विस्तार होईल.

आतापर्यंत अमेरिकेच्या १८ सैनिकांचा मृत्यू

दरम्यान, अमेरिकेने इराणी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तिसऱ्या सैनिकाची ओळख जाहीर केली आहे. सार्जंट एंजेल एस. रामपर्साड (वय २८) यांच्या मृत्यूनंतर संघर्ष सुरू झाल्यापासून अमेरिकेच्या मृत सैनिकांची संख्या १८ वर पोहोचली आहे.

कुवेत, जॉर्डनने पाडली इराणची ड्रोन

दुसरीकडे, कुवेतने इराणी ड्रोन पाडल्याचे म्हटले असून जॉर्डनने आपल्या हवाई क्षेत्रात आलेल्या सहा क्षेपणास्त्रांपैकी चार पाडल्याची माहिती दिली आहे. बहरीनसह अनेक आखाती देशांमध्ये हवाई हल्ल्यांच्या इशाऱ्यांनंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news