UK Child Grooming Gang scandal : पाकिस्तानी पुरुषांच्या टोळीचे अल्पवयीन मुलींवर अत्याचार, ब्रिटिश खासदाराकडून ‘ग्रुमिंग गँग’चा पर्दाफाश

UK Child Grooming Gang scandal : पाकिस्तानी पुरुषांच्या टोळीचे अल्पवयीन मुलींवर अत्याचार, ब्रिटिश खासदाराकडून ‘ग्रुमिंग गँग’चा पर्दाफाश
file photo
Published on
Updated on

लंडन : ब्रिटनमध्ये अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. या टोळीला ‘ग्रुमिंग गँग’ असे नाव देण्यात आले असून या लैंगिक छळ प्रकरणातील पीडितांचे धक्कादायक अनुभव ब्रिटनचे खासदार रूपर्ट लोव्ह यांनी संसदेत वाचून दाखवले.

‘ग्रुमिंग गँग’ लैंगिक छळामागे पीडितांची जात, धर्म आणि वंश कारणीभूत असल्याचा दावा खासदार लोव्ह यांनी संसदेत केला. या प्रकरणाच्या चौकशी अहवालाला लोव्ह यांनी ‘रेप गँग’ असे नाव दिले आहे. खा. लोव्ह यांनी संसदेत पीडितांची कैफियत मांडली.

श्वेतवर्णीय आणि ख्रिश्चन मुलींना कमी मूल्य दिले जात होते; तर मुस्लिम मुलींना उच्च नैतिक दर्जाचे मानले जायचे, असा अनुभव पीडितांनी सांगितल्याचे ते म्हणाले. संसदीय विशेषाधिकाराचा वापर करून या गुन्ह्यातील आरोपींची आणि त्यांना मदत करणाऱ्यांची नावे संसदेत जाहीर करणार असल्याचे त्यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच, या टोळीतील सर्वांचीच देशातून हकालपट्टी करण्याची जोरदार मागणी त्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news