Female Director Fired For Sleeping At Desk: आळशी... डेस्कवर झोपते.. म्हणत कंपनीने काढून टाकलं; महिला कोर्टात गेली अन् जिंकली

लंडनमधील साऊथ एम्प्लॉयमेंट ट्रिब्युनलने निर्णय देताना कंपनीने या महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून अयोग्य पद्धतीने हटवलं असल्याचं म्हटलं आहे.
Female Director Fired For Sleeping At Desk
Female Director Fired For Sleeping At Deskpudhari
Published on: 
Updated on: 

Female Director Fired For Sleeping At Desk: ब्रिटनची एक एआय कंपनीमधील महिला डायरेक्टरला सहकाऱ्यांनी अत्यंत आळशी म्हणत त्यांच्यावर ऑफिस डेस्कवर झोपणे, लवकर घरी जाणे आणि काम पूर्ण करण्यास जास्त वेळ लावण्याचे गंभीर आरोप केले होते. मात्र कंपनीने या महिलेला नोकरीवरून काढून टाकलं त्यावेळी हे प्रकरण रोजगार ट्रिब्युनलमध्ये पोहचले.

आता लंडनमधील साऊथ एम्प्लॉयमेंट ट्रिब्युनलने निर्णय देताना कंपनीने या महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून अयोग्य पद्धतीने हटवलं असल्याचं म्हटलं आहे. न्यालायलाने सांगितलं की कंपनीने त्यांच्या कामगिरीबाबत उपस्थित झालेले प्रश्न योग्य पद्धतीने हाताळण्यात अन् दुसऱ्या एका डायरेक्टरसोबतचा वाद सोडवण्यासाठी योग्य पावले उचलली नाही.

Female Director Fired For Sleeping At Desk
Fake High Court Orders: सामान्यांना सोडा सरकारलाच गंडवलं... HCचा 'खोटा' आदेश काढून अवैध सट्टेबाजी वेबसाईट करण्यात आल्या ब्लॉक

डॉक्टर ते एआय कंपनीची डायरेक्टर

हे प्रकरण ४६ वर्षाच्या डॅनी लुओ यांच्या बाबतीतील आहे. त्या यापूर्वी चीनमध्ये मेडिकल डॉक्टर म्हणून काम करत होत्या. २०२० मध्ये त्या ब्रिटनमध्ये आल्या आणि त्याच वर्षी त्यांनी ब्लू स्ट्रॉबेरी AI कंपनीत सामील झाल्या. ही कंपनी यापूर्वी कँडरबरी एआय कंपनी या नावाने ओळखली जात होती. लुओ तिथे मीडिया मॅनेजमेंट आणि मार्केटिंगशी संबंधित काम करतात. लुओ यांनी या कंपनीत मोठी गुंतवणूक देखील केली होती. त्या शेअर होलेडर, डायरेक्टर आणि कर्मचारी आहेत. ट्रिब्युनलमधील माहिती नुसार कंपनीला माहिती होते की लुओ यांन या पूर्वी बिजनेसचा कोणता अनुभव नव्हता.

Female Director Fired For Sleeping At Desk
Kerala High Court | विधिसंघर्षग्रस्त बालकांचे वय १६ वर्षे करण्याची हीच योग्य वेळ

न्यायालयाने काय सांगितलं?

एम्प्लॉयमेंट जज जेम्मा कॉथ्रे यांनी लंडन साऊथ एम्प्लॉयमेंट ट्रिब्युनलमध्ये निर्णय देताना कंपनीने लुओ यांच्या कामगिरीबाबतची चिंता योग्य प्रकारे हँडल करण्यासाठी योग्य पावले उचलली नाहीत. तसेच त्यांनी दुसऱ्या डाटरेक्टरसोबतचा वाद मिटवण्याचा देखील प्रयत्न केला नाही. कंपनीने लुओ यांना लिम्बो स्थितीत सोडून दिलं.

ट्रिब्युनलने लुओ यांना कंपनीतून काढून टाकणे, त्यांचा पगार न देणे आणि वकीलांच्या नोटीसला उत्तर न देणे या सर्व गोष्टी पाहून ट्रिब्युनलने लुओ यांना चुकीच्या पद्धतीनं काढून टाकल्याची तक्रार ग्राह्य धरली.

Female Director Fired For Sleeping At Desk
Supreme Court Order: याला न्याय कसा म्हणावा... SC कडून २२ वर्षे तुरूंगात असलेल्या व्यक्तीची केली सुटका, HC वर ओढले ताशेरे

कंपनीला ४,३३३ पाऊंड वेतन द्यावं लागणार

ट्रिब्युनलने कराराच्या उल्लंघनाबाबत देखील निर्णय दिला. कंपनीने नोटीस वेतन दिलं न्हत आणि ४,३३३ पाऊंड सॅलरी देखील बेकायदेशीरपणे कापली होती. आता चुकीच्या पद्धतीने काढून टाकल्याबद्दल लुओ यांना अतिरिक्त नुकसान भरपाई किती मिळणार याचा निर्णय होणे अजून बाकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.