UAE royal family member found unconscious |यूएईच्या राजघराण्याची सून नशेत रस्त्यावर बेशुद्ध

कोकेन सेवन : तीन वर्षांच्या मुलाला रस्त्यावर एकटे सोडल्याने ७.७ लाखांचा दंड
UAE royal family member found unconscious
UAE royal family member found unconscious
Published on: 
Updated on: 

लंडन : वृत्तसंस्था

संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) अबू धाबीच्या राजघराण्याशी विवाहामुळे संबंधित असलेल्या ३२ वर्षीय महराह अल नाहयान यांना मुलाच्या देखभालीत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी लंडनमधील न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्यांना दोन वर्षे पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी व्हावे लागणार असून सुमारे ७.७ लाख रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे. कोकेन सेवन केल्यानंतर त्या रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडल्या होत्या. त्यावेळी त्यांचा तीन वर्षांचा मुलगा बिनबुटांच्या अवस्थेत रस्त्यावर एकटाच खेळत होता.

अर्धा तास रस्त्याच्या कडेला बेशुद्ध ही घटना १३ जून रोजी पश्चिम लंडनमध्ये घडली. न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, महराह लोखंडी कठड्याला टेकून बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांच्याजवळ आणखी एक व्यक्तीही बेशुद्धावस्थेत होती. दरम्यान, त्यांचा तीन वर्षांचा मुलगा स्कूटरवर खेळत होता. तो वर्दळीच्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या जवळ होता. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी मुलाला एकटे पाहून मदतीसाठी धाव घेतली. पोलिस येईपर्यंत त्यांनी मुलाची काळजी घेतली.

महराह जवळपास ३० मिनिटे बेशुद्ध होत्या. पोलिसांनी महराह यांच्या बॅगची तपासणी केली. त्यात अमली पदार्थांच्या सेवनाशी संबंधित साहित्य आढळले.

UAE royal family member found unconscious
Canada Immigration Rules : कॅनडाने इमिग्रेशन पॉलिसी बदलली, जाणून घ्या नव्या नियमांचा कोणाला होणार फायदा

यूएईच्या राजघराण्याशी संबंध

महराह या विवाहामुळे अबू धाबीच्या अल नाहयान राजघराण्याशी संबंधित आहेत. मात्र, सार्वजनिक वृत्तांमध्ये त्यांच्या पतीचे नाव आणि राजघराण्यातील त्यांचे नेमके नाते स्पष्ट झालेले नाही. यूएईचे अध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे याच राजघराण्यातील आहेत.

UAE royal family member found unconscious
Starlink vs Reliance : मस्क विरुद्ध अंबानी 'वाक्युद्ध' विकोपाला! रिलायन्सच्या आव्हानाला 'स्टारलिंक'ने काय प्रत्युत्तर दिले?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news