टोकियो विमानतळाच्या धावपट्टीवरच धडकली दोन प्रवासी विमाने

टोकियो विमानतळाच्या धावपट्टीवरच धडकली दोन प्रवासी विमाने
Published on
Updated on

टोकियो :  येथील हानेडा विमानतळावर शनिवारी सकाळी धावपट्टीवर दोन प्रवासी विमानांची धडक झाली. यात कोणीही जखमी झाले नसले तरी या धडकेमुळे विमानतळ दोन तासांसाठी बंद करण्यात आले होते. स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता धावपट्टीवर उभ्या असलेल्या थाई एअरवेजच्या विमानाला टॅक्सी वे वरून वळून येणार्‍या तैवानच्या इव्हा एअरवेजच्या विमानाने धडक दिली. या विमानाचा वेग अत्यंत कमी असल्याने कोणालाही इजा झाली नाही. पण विमानांचे मात्र किरकोळ नुकसान झाले.

जपानच्या विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या अपघातानंतर विमानतळ दोन तासांसाठी बंद ठेवण्यात आले. दोन्ही विमानांची तपासणी केली असता थाई एअरवेजच्या विमानाच्या पंखाचा काही भाग किरकोळ खराब झाला. ही घटना घडली तेव्हा थाई एअरवेजच्या विमानात 260 प्रवासी होते तर इव्हा एअरवेजच्या विमानात 200 प्रवासी होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news