

Israeli–Palestinian conflict : इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांवर जवळून गोळ्या झाडण्यात आल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी वॉशिंग्टनमधील कॅपिटल ज्यूइश म्युझियममध्ये घडली. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी क्रिस्टी नोएम यांनी एक्सवरील पोस्टद्वारे ही बातमी शेअर केली. अमेरिकन अॅटर्नी जीनिन पिरो यांच्यासोबत घटनास्थळी असलेल्या अॅटर्नी जनरल पाम बोंडी यांनी घटनेची पुष्टी केली आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, वॉशिंग्टनमधील एफबीआय फील्ड ऑफिस आणि यूएस अॅटर्नी ऑफिसजवळ कॅपिटल ज्यूइश म्युझियम आहे. येथील थर्ड आणि एफ स्ट्रीट्सजवळ एका पुरूष आणि एका महिलेवर गोळ्या झाडण्यात आल्या. वॉशिंग्टन पोलिस प्रमुख पामेला स्मिथ यांनी सांगितले की, घटनेपूर्वी संग्रहालयाबाहेर जाताना दिसणारा एकमेव संशयित ताब्यात आहे. संशयिताने कोठडीत "फ्री पॅलेस्टाईन" अशा घोषणा देत होता.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ'वरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ही घटना स्पष्टपणे ज्युविरोधी होती. त्या त्वरित थांबल्या पाहिजेत. द्वेष आणि अतिरेकीपणाला अमेरिकेत कोणतेही स्थान नाही. ज्यु- विरोधी या भयानक हत्याकांड आताच संपले पाहिजे!”
इस्रायली अध्यक्ष आयझॅक हर्झोग आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीही या घटनेचा निषेध केला. इस्रायली अध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "वॉशिंग्टन डीसीमधील दृश्यांमुळे मी हताश झालो आहे. हे द्वेषाचे ज्यु -विरोधी कृत्य आहे. यामध्ये इस्रायली दूतावासातील दोन तरुण कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आपल्या लोकांचे आणि आपल्या सामायिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायल एकत्र उभे राहतील. दहशतवाद आणि द्वेष आपल्याला तोडणार नाहीत,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
इस्रायलचे संयुक्त राष्ट्रांचे राजदूत डॅनन यांनी या हल्ल्याचा निषेध "यहूदी-विरोधी दहशतवादाचे गंभीर कृत्य" म्हणून केला. पोलिसांनी अद्याप त्याचा हेतू उघड केलेला नाही. आम्हाला खात्री आहे की अमेरिकन अधिकारी या गुन्हेगारी कृत्यासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करतील," डॅनन यांनी X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. "इस्रायल जगातील सर्वत्र आपल्या नागरिकांचे आणि प्रतिनिधींचे संरक्षण करण्यासाठी दृढनिश्चयाने काम करत राहील." असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
या घटनेप्रकरणी 'एफबीआय'चे संचाक काश पटेल म्हणाले की, महानगर पोलिस विभागासोबत प्रतिसाद देण्यासाठी आणि अधिक जाणून घेण्यासाठी काम करत असताना, त्वरित, कृपया पीडितांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करा," असे त्यांनी X वर लिहिले आहे.