ब्रुसेल्स (बेल्जियम) : पुढारी ऑनलाईन
इस्रायली सैन्य आणि पॅलेस्टाईन अतिरेक्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी युरोपियन संघ आपले प्रयत्न आणखी वाढवणार आहे. प्रसार माध्यमांची कार्यालये असलेल्या इमारतींवर झालेल्या हल्याबद्दल चिंता व्यक्त करत पत्रकारांना सुरक्षितपणे काम करता येणे आवश्यक असल्याचेही युरोपियन संघाने नमूद केले.
युरोपियन संघाने आपल्या २७ सदस्य देशांसह या संघर्षाला रोखण्यासाठी एकत्र येऊन ठाम भूमिका मांडली पाहजे असे मत रोमचे परराष्ट्र मंत्री लुईगी डी माईओ यांनी व्यक्त केले आहे.
गाझाच्या आरोग्य मंत्रात्रालयानुसार आतापर्यंत या संघर्षात १९८ पॅलेस्टीनी ठार झाले असून, १३०० जण जखमी झाले आहेत. तर इस्रायलमध्ये रॉकेट हल्ल्यात ८ जण ठार झाले आहेत.
तब्बल १९० कोटींची लॉटरी लागली, पण तिकिट खिशात धुवून गेल्याने माती झाली!
हिंद महासागरात आढळला 'डायनासोर' युगातील जिवंत मासा
इस्रायलचा माध्यमांवर हल्ला! एअर स्ट्राईकमध्ये 12 मजली 'गाझा टॉवर' ही इमारत उद्ध्वस्त