US-Iran conflict | ट्रम्प यांच्या आडमुठेपणामुळे चर्चेला खीळ

ट्रम्प यांच्या विरोधाभासी वक्तव्यांमुळे इराणच्या मनात शंका
US-Iran conflict |
US-Iran conflict | ट्रम्प यांच्या आडमुठेपणामुळे चर्चेला खीळ
Published on
Updated on

तेहरान, वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिका-इराण संघर्षात जाहीर झालेला युद्धविराम हा वरकरणी शांततेचा मार्ग वाटत असला, तरी त्यामागची ‘इनसाईड स्टोरी’ मात्र अधिक गुंतागुंतीची आणि तणावपूर्ण आहे. विशेषतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक आणि विसंगत वक्तव्यांमुळे शांतता चर्चेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ट्रम्प यांची शैलीच अडथळा

युद्धविराम जाहीर असतानाही ट्रम्प यांची भाषा आणि धोरणात्मक भूमिका आक्रमकच राहिली. एका बाजूला ते इराणवर दबाव टाकत आहेत, तर दुसर्‍या बाजूला चर्चेसाठी तयार असल्याचे सांगतात. या विरोधाभासी संदेशांमुळे इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या मध्यस्थीत सुरू असलेल्या चर्चांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. इराणचे प्रमुख वाटाघाटी प्रतिनिधी महंमद बाघेर कालिबाफ यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, ‘धमक्यांच्या सावलीत चर्चा मान्य नाहीत. यामुळे युद्धविरामाचा हेतूच संशयास्पद ठरत आहे.’

इराणची अंतर्गत राजकीय कसरत

इराणलाही स्वतःच्या जनतेसमोर ठाम भूमिका घ्यावी लागत आहे. ट्रम्प यांनी वारंवार ‘इराण माघार घेत आहे’ किंवा ‘ते हतबल झाले आहेत’ असे दावे केल्यामुळे तेहरानवर दबाव वाढला आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी होर्मुझ सामुद्रधुनीवरील काही निर्बंध सैल करण्याची घोषणा केली होती, पण त्याला प्रतिसाद म्हणून अमेरिका नाकेबंदी उठवण्याऐवजी ट्रम्प यांनी त्याला इराणचा पराभव ठरवले.

होर्मुझ सामुद्रधुनीवरून वाढलेला तणाव

होर्मुझ सामुद्रधुनीची नाकाबंदी हा या संघर्षाचा केंद्रबिंदू बनला आहे. ट्रम्प यांनी ‘इराणला सामुद्रधुनी उघडायची आहे, पण आम्ही कराराशिवाय तसे करणार नाही’ असे सांगितले.पण त्यानंतर इराणने पुन्हा सामुद्रधुनी बंद करून ट्रम्प यांच्या दाव्यांना प्रत्यक्ष उत्तर दिले. यामुळे अमेरिकेने इराणच्या निर्धाराचा कमी अंदाज लावण्यात कमी पडल्याचेे दिसून आले.

करारासाठी कठोर अटी

या सर्व घडामोडींमुळे इराण आता कोणत्याही करारासाठी अधिक सावध झाला आहे. ट्रम्प यांच्या अनिश्चित भूमिकेमुळे इराणला खात्री हवी आहे की भविष्यातील करार कायमस्वरूपी आणि अमलात येणारा असेल. यामुळे युद्धविराम असूनही प्रत्यक्षात दोन्ही देशांमध्ये अविश्वास अधिकच वाढलेला दिसतो.

वाटाघाटींचे भवितव्य अधांतरी

युद्धविराम हा केवळ कागदोपत्री शांतता दाखवत असला, तरी प्रत्यक्षात दोन्ही देशांमध्ये अविश्वास आणि राजकीय खेळी अधिक तीव्र झाल्या आहेत. ट्रम्प यांची अनिश्चित आणि आक्रमक शैली हीच शांततेच्या मार्गातील सर्वात मोठी अडचण ठरत आहे. त्यामुळे पुढील वाटाघाटींचे भवितव्य अजूनही अनिश्चितच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news