US-Iran Tensions |"तुमचं पेट्रोल-डिझेल तुम्हीच मिळवा!" : 'हॉर्मुझ'वरून ट्रम्प यांचा ब्रिटनसह मित्र राष्ट्रांना इशारा

US-Iran Tensions | कठीण काळात मित्रराष्ट्र अमेरिकेच्या पाठीशी उभे राहिले नाहीत
US-Iran Tensions
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प.Pudhari Photo.
Published on
Updated on

US-Iran Tensions

वॉशिंग्‍टन : "जा आणि तुमचं कच्‍चे तेल(पेट्रोल-डिझेल ) तुम्हीच मिळवा!", असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्यांमध्ये अमेरिकेला साथ न देणाऱ्या मित्र राष्‍ट्रांना दिला आहे. सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल'वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ज्या देशांनी "इराणविरोधातील मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिला, त्यांनी एकतर अमेरिकेकडून तेल विकत घ्यावे किंवा हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून स्वतः जाऊन ते मिळवावे.

मित्र राष्ट्रांवर संताप

आपल्या पोस्टच्या ट्रम्प यांनी म्‍हटलं आहे की, आता या देशांना स्वतःसाठी "लढायला" शिकावे लागेल. ज्याप्रमाणे कठीण काळात हे मित्रराष्ट्र अमेरिकेच्या पाठीशी उभे राहिले नाहीत, त्याचप्रमाणे यापुढे अमेरिकाही त्यांना कोणतीही मदत करणार नाही.

US-Iran Tensions
Donald Trump | 'होर्मुझ' तात्‍काळ उघडा, अन्यथा...' : ट्रम्प यांनी दिली इराणचे तेल आणि वीज नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची धमकी
Pudhari

थोडे उशिरा का होईना; पण धाडस दाखवा

"हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे ज्या देशांना जेट इंधन मिळत नाहीये—जसे की युनायटेड किंगडम (UK), ज्याने इराणविरुद्धच्या कारवाईत सामील होण्यास नकार दिला—त्यांच्यासाठी माझ्याकडे एक सल्ला आहे: पहिले म्हणजे, अमेरिकेकडून तेल विकत घ्या, आमच्याकडे भरपूर साठा आहे. दुसरे म्हणजे, थोडे उशिरा का होईना पण धाडस दाखवा, सामुद्रधुनीत जा आणि स्वतःचे तेल स्वतः मिळवा," असे ट्रम्प यांनी लिहिले.

US-Iran Tensions
Donald Trump Iran attack | 'आम्हाला पेट्रोल-डिझेलची गरज नाही' : ट्रम्प यांचे युद्धाच्या १८ व्या दिवशी मोठे विधान

"लढायला शिका"

ट्रम्प यांनी पुढे नमूद केले की, "तुम्हाला आता स्वतःची लढाई स्वतः लढायला शिकावे लागेल. अमेरिका आता मदतीसाठी तिथे नसेल, कारण तुम्हीही आमच्यासाठी तिथे नव्हता. इराणचा जवळपास नायनाट झाला आहे, कठीण काम पूर्ण झाले आहे. आता जा आणि तुमचं तेल तुम्हीच मिळवा." दरम्‍यान, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्‍या हल्‍ल्‍यानंर महिना उलटला तरी, इराणने अजूनही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपले नियंत्रण कायम ठेवले आहे, ज्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news